शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

बॅरिकेट्स हटविले; शेतकरी रस्त्यावरच; राकेश टिकैत यांनी केंद्राला दिली २६ नोव्हेंबरची डेडलाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 6:31 AM

 पोलिसांनी बॅरिकेट्स हटविले असले तरी तिन्ही कृषी कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. पोलिसांनी बळजबरी केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर सर्व शेतकरी ठिय्या देतील आणि तिथेच काळी दिवाळी करतील.

विकास झाडेलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रस्ते अडवू नका असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर जिथे जिथे शेतकरी आंदोलन सुरू आहे तिथले बॅरिकेट्स पोलिसांनी हटवले आहेत. परंतु शेतकरी अद्यापही रस्त्यांवर असल्याने वाहतुकीचा प्रश्न कायम आहे.

 पोलिसांनी बॅरिकेट्स हटविले असले तरी तिन्ही कृषी कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. पोलिसांनी बळजबरी केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर सर्व शेतकरी ठिय्या देतील आणि तिथेच काळी दिवाळी करतील. केंद्र सरकारकडे २६ नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे. या दिवशी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. २७ नोव्हेंबरपासून शेतकरी गावागावांतून ट्रॅक्टरद्वारे दिल्लीच्या सीमांवर पोहोचतील आणि तिथे कायमस्वरूपी तंबू बांधतील, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. गाझीपूर येथील आंदोलनाच्या जागेजवळील सिमेंट आणि लोखंडी बॅरिकेड्स व काटेरी तारा पोलिसांनी हटवल्यानंतर टिकैत यांनी सरकारला इशारा दिला आहे. सीमेवरून शेतकऱ्यांना जबरदस्तीने हटवण्याचा प्रयत्न झाल्यास देशभरातील सरकारी कार्यालये मंडईत परिवर्तित झालेली दिसतील. दरम्यान, युनायटेड किसान मोर्चाचे सदस्य आणि भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष गुरनाम सिंग चढुनी यांनीही केंद्रावर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास यावेळची दिवाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर करू.

सीमांवर काय आहे स्थिती? गाझीपूर सीमा, टिकरी सीमेवरीला अडथळे पोलिसांनी हटवले आहेत. परंतु रहदारी मात्र नेहमीसारखी एकाच लेनने सुरू आहे. सिंघू सीमा, रेवाडी-मानेसर मार्गावरील आंदोलनस्थळी बॅरिकेट्स जैसे थे आहेत. त्यामुळे या महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांना कासवगतीने पुढे जावे लागते. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन