शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

२० केंद्रीय पोलीस यंत्रणांच्या माजी प्रमुखांच्या सुरक्षा सेवेत बटालियन

By admin | Published: October 26, 2016 1:25 AM

माहितीच्या अधिकारात विचारलेल्या एका साध्या प्रश्नाने केंद्रीय गुप्तचर खाते (सीबीआय), रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दल

- हरीश गुप्ता, नवी दिल्लीमाहितीच्या अधिकारात विचारलेल्या एका साध्या प्रश्नाने केंद्रीय गुप्तचर खाते (सीबीआय), रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आदी केंद्र सरकारच्या २० पोलीस यंत्रणांमध्ये खळबळ निर्माण झाली. प्रश्न साधाच विचारण्यात आला होता की या यंत्रणांच्या माजी प्रमुखांना तुम्ही सुरक्षेसह अन्य काही सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत का? पोलीस यंत्रणांच्या माजी प्रमुखांच्या सेवेत अनधिकृतपणे असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या एका बटालियनएवढी होईल.माहितीचा अधिकार कार्यकर्त्याने प्रश्न पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) विचारला होता. तो तसाच पीएमओने या सगळ््या यंत्रणांकडे पाठवला. या संघटनांचे संचालक आणि महासंचालकांच्या कार्यालयांत हा प्रश्न धडकताच खळबळ निर्माण झाली. सीबीआयच्या माजी संचालकाच्या सेवेत २२ सुरक्षा कर्मचारी व दोन कार असल्याचे त्यातून उघड झाले. सीबीआय देत असलेल्या या सुरक्षेची केंद्रीय गृह मंत्रालयाला काहीही माहिती नाही कारण सीबीआयच्या माजी संचालकांना अशा सोयी सवलती देण्याची पद्धत आहे. काही संचालक दोन ते तीन सुरक्षा सैनिक, कारचालक व काही प्रमाणात घरचा मदतनीस या सवलतींवरच समाधानी आहेत. इतर काहींनी यापेक्षा जास्त लाभ घेतले आहेत. परंतु सीबीआयच्या माजी वादग्रस्त संचालकाला २४ तास सुरक्षा हवी असून ती त्यांना दिली गेली आहे. माहितीच्या अधिकारातील अर्ज संचालकांच्या टेबलवर दाखल होताच घबराट निर्माण झाली. आता ही सुरक्षा व्यवस्था केवळ दोन सुरक्षा रक्षकांवर आणण्यात आली. सीआयएसएफचे माजी महासंचालक सध्या ओडिशात राहत असून ते १८ वर्षांपूर्वी सेवेत होते. त्यांच्या सेवेत दोन सुरक्षा रक्षक असून ते त्यांना दैनंदिन कामकाजात मदत करतात, असे आढळले आहे.सेवानिवृत्तीनंतरही फायदे लाटण्याचे दिवस ठरतील भूतकाळ रेल्वे संरक्षण दलातील सूत्रांनी सांगितले की पोलिसांच्या माजी प्रमुखांना सेवानिवृत्तीनंतर साह्य देण्याची अनेक वर्षांपासूनची रीत आहे. हीच रीत गुप्तचर खात्यातही (आयबी) असून त्यांना निवृत्तीनंतरच्या सवलती समजले जाते. अनेक दशके या गोष्टी दडवून ठेवण्यात आल्या व कोणीही त्याबद्दल प्रश्न विचारले नाहीत. परंतु आता आलेले माहितीच्या अधिकाराचे दिवस आणि कठोर वागणाऱ्या पंतप्रधानांच्या कार्यालयामुळे महासंचालक आता त्याला झाकण्यासाठी धावाधाव करीत आहेत.माजी संचालकांना सुरक्षा किंवा घरगुती कामासाठी मदतनीस देण्याचा कोणताही कायदा किंवा नियम नाही. अनधिकृतपणे दिल्या गेलेल्या सुरक्षेवरील कर्मचारी मोजले तर त्यांची संख्या एका बटालियनएवढी (जवळपास एक हजार सैनिक) होईल. काही माजी महासंचालकांना खरोखर सुरक्षेचा धोका आहे. परंतु सीआयएसएफचे महासंचालक, रेल्वे सुरक्षा दल, बीपीआर अँड डी आणि इतरांना सुरक्षेचा धोका कसा असू शकेल? सध्या पोलीस संघटनांमध्ये जो काही विचार होतो आहे त्यावरून सेवानिवृत्तीनंतरही फायदे लाटण्याचे दिवस आता भूतकाळ ठरतील, असे दिसते.