शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
7
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
8
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
9
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
10
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
11
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
12
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
14
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
16
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
17
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
18
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
19
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
20
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."

तोफखाना होणार प्रबळ; अल्ट्रालाइट हॉवित्झर, के ९ वज्रमुळे सामर्थ्यात मोलाची भर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 5:48 AM

भारतीय लष्कराच्या सैन्यदलाची गेल्या २० वर्षांपासूनची आधुनिक तोफांची मागणी येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे.

- निनाद देशमुख पुणे : भारतीय लष्कराच्या सैन्यदलाची गेल्या २० वर्षांपासूनची आधुनिक तोफांची मागणी येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. अमेरिकन बनावटीच्या अल्ट्रालाईट हॉवित्झर आणि कोरियन बनावटीच्या के ९ वज्र या तोफा येत्या शुक्रवारी लष्कराला सुपूर्द करण्यात येणार आहेत. नाशिक येथील आर्टिलियरी सेंटरमध्ये केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या अत्याधुनिक तोफांचे हस्तांतरण होणार असून, सैन्याच्या मारकक्षमतेत मोठी वाढ होणार आहे.कुठल्याही लष्करात तोफखाना महत्त्वाचा असतो. कारण, दूरवर तोफगोळ्यांची मारकक्षमता तसेच पुढे असलेल्या सैन्याला कव्हर करण्यासाठी मोलाची भूमिका तोफखाना बजावत असतो. भारतीय लष्करात सद्यस्थितीत बोफोर्स तोफ ही सर्वाधिक आधुनिक तोफ आहे. या अल्ट्रालाईट हॉवित्झर प्रकारच्या तोफा लष्करात असाव्या, अशी मागणी गेल्या २० वर्षांपासून होती. मात्र, बोफोर्स प्रकरणानंतर नव्या तोफा लष्करात दाखल होऊ शकल्या नव्हत्या.यामुळे सर्व भार हा बोफोर्स तोफांवर येत होता. तसेच तोफखान्यातील काही महत्त्वाच्या तोफांचा कालावधी संपल्याने त्या निवृत्त करण्यात आल्या. यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी भरून काढणे गरजेचे असल्याने नव्या तोफा लष्करात दाखल होणे गरजेचे होते. गेल्या काही दिवसांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते. अमेरिकेशी झालेल्या करारानुसार अल्ट्रालाईट हॉवित्झर (एम ७७७) तोफा तयार करण्यात आल्या आहेत. तसेच कोरियन बनावटीच्या के ९ वज्र या तोफा लष्कराला सुपूर्द करण्यात येणार आहेत. आधुनिक असलेल्या या तोफांमुळे लष्कराची २० वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे. जवळपास ४० ते ४५ किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता या तोफांमध्ये आहे.केंद्रीय संरक्षणमंत्र्यांकडून हस्तांतरणनाशिक येथील आर्टिलियरी सेंटरला येत्या शुक्रवारी केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सितारामन भेट देणार आहेत. या वेळी आयोजित कार्यक्रमात या दोन्ही तोफा लष्कराला हस्तांतरित करणार आहेत.भारतीय लष्कराला गेल्या ३० वर्षांपासून आधुनिक तोफांची गरज होती. दरम्यान झालेल्या सरकारने बोफोर्स प्रकरणामुळे नवी शस्त्रे खरेदी केली नाही. याचे गंभीर परिणाम भारताच्या सुरक्षेवर झाला. यामुळे नव्या तोफांची गरज भारतीय सैन्यदलाला होती. या तोफांचे अनेक भाग भारतातच बनविलेले आहेत. यामुळे शस्त्रास्त्रनिर्मितीतसुद्धा आपण पुढे गेलो आहोत.- दत्तात्रय शेकटकर,निवृत्त लेफ्टनंट जनरलतोफखाना दलाची पोकळी निघणार भरून१९८४ नंतर बोफार्स प्रकरणानंतर लष्कराच्या तोफखान्यात नव्या तोफा दाखल झाल्या नव्हत्या. केवळ बोफार्स याच तोफांवर लष्कराचा भार होता. या बरोबरच नवी लष्करी साधने सुद्धा येऊ शकली नव्हती. मध्यम पल्ल्याच्या अनेक तोफा निवृत्त झाल्यामुळे तोफखान्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती. यामुळे ही पोकळी भरून निघणे आवश्यक होते. या दोन नव्या तोफा लष्कराच्या ताफ्यात दाखल होत असल्याने गेल्या २० वर्षांतील पोकळी भरून निघणार आहे.-निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान