अस्तित्वाची लढाई; काँग्रेससाठी आव्हानात्मक असेल २०२२; उत्तर प्रदेश, पंजाब विधानसभा तोंडावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 05:36 AM2022-01-01T05:36:54+5:302022-01-01T05:37:10+5:30
Congress : ग्रुप २३ च्या मोठ्या नेत्यांचे लक्ष उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीवर आहे. काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही, तर हा गट बंडखोरीचा मार्ग निवडू शकतो.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : अस्तित्वासाठी संघर्ष करत असलेल्या काँग्रेससाठी नवीन वर्ष २०२२ आव्हानात्मक असेल. याची पहिली परीक्षा उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यासह निवडणूक असलेल्या राज्यांत होणार आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये जर काँग्रेसला अनुरूप निकाल मिळाले नाहीत, तर पक्षात एक मोठे विभाजन होणे निश्चित आहे.
ग्रुप २३ च्या मोठ्या नेत्यांचे लक्ष उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीवर आहे. काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही, तर हा गट बंडखोरीचा मार्ग निवडू शकतो. मात्र, जर पंजाबमध्ये काँग्रेसने सत्ता राखली आणि उत्तर प्रदेशात चांगली कामगिरी केली, तर हे बंड रोखण्यात काँग्रेस यशस्वी होऊ शकतो. २०२२ मध्ये पक्षाला नवा पूर्णवेळ अध्यक्ष मिळणार आहे. सध्या पक्षाकडे ना पूर्णवेळ अध्यक्ष आहे, ना निवडलेली कार्यसमिती. गांधी कुटुंबाचे वर्चस्व राहणार की नाही, हे २०२२ मध्ये ठरणार आहे.
आव्हान काय?
२०२२ च्या अखेरीस गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात विधानसभा निवडणुका होणार आहेत. याची रणनीती आखण्याचे आव्हान असणार आहे. काँग्रेसला एकीकडे छत्तीसगडमधील सत्ता कायम राखण्याचे आव्हान असणार आहे, तर मध्य प्रदेशात भाजपने हिसकावलेली सत्ता पुन्हा मिळवून बदला घ्यायचा आहे.
गुजरातमध्ये कमजोर संघटनेच्या जीवावर भाजपचा किल्ला उद्ध्वस्त करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. २०२५ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षसंघटनेला उभे करून मजबूत करण्याचीही गरज आहे.