शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
4
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
5
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
6
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
7
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
8
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
9
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
10
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
11
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
12
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
13
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
14
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
15
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
16
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
17
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
18
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
19
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
20
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल

बिहारच्या महाआघाडीत लढाईआधीच ‘यादवी’

By admin | Published: September 04, 2015 1:23 AM

बिहार विधानसभा निवडणुकीत ‘मोदी मॅजिक’चा मुकाबला करण्यासाठी जुने वैमनस्य विसरून एकजूट झालेला जनता परिवार ‘यादवी’मुळे पुन्हा विखुरला. जागावाटपावरून असंतुष्ट असलेल्या

लखनऊ : बिहार विधानसभा निवडणुकीत ‘मोदी मॅजिक’चा मुकाबला करण्यासाठी जुने वैमनस्य विसरून एकजूट झालेला जनता परिवार ‘यादवी’मुळे पुन्हा विखुरला. जागावाटपावरून असंतुष्ट असलेल्या मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पार्टीने (सपा) गुरुवारी महाआघाडीशी काडीमोड घेत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.या वर्षाच्या प्रारंभी एकत्रित आलेल्या जनता परिवारातील सहा पक्षांपैकी सपा हा एक महत्त्वाचा घटक पक्ष असून, त्याने वेगळी चूल मांडण्याचे ठरविल्याने संयुक्त जनता दलाचे (संजद)नेते नितीशकुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद)सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना फार मोठा हादरा बसला आहे.सपा प्रमुख मुलायमसिंग यादव यांच्या अध्यक्षतेखाली येथे झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत उपरोक्त निर्णय झाला. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि प्रवक्ते रामगोपाल यादव यांनी पत्रकारांना या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, राज्य विधानसभेच्या एकूण २४३ जागांपैकी केवळ ५ जागा सपाला देण्याचा प्रस्ताव अपमानास्पद आहे. जागावाटप करण्यापूर्वी सपासोबत विचारविनिमय करणे हे जनता परिवारातील इतर प्रमुख घटक पक्षांचे कर्तव्य होते परंतु असे घडले नाही. माध्यमांमधून आम्हाला याबाबत माहिती मिळाली. हा ‘आघाडी धर्म’ नाही. पाच जागांना पक्षश्रेष्ठींची सहमती नव्हती आणि प्रामुख्याने बिहारमधील पक्ष कार्यकर्त्यांना हे अजिबात मान्य नव्हते. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखून राज्यात सन्मानाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रदेश अध्यक्ष रामचंद्र यादव पक्षाच्या उमेदवारांची यादी तयार करतील. महाआघाडीत संजद आणि राजद या दोन्ही पक्षांना प्रत्येकी १०० जागा देण्यात आल्या असून काँग्रेस ४० जागांवर निवडणूक लढविणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला फक्त ३ जागा आल्या आहेत.(वृत्तसंस्था)—————————-कोट-कोटमला सपाच्या निर्णयाची कल्पना आहे. परंतु मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आमची महाआघाडी कायम राहील. आम्ही चर्चा करू. तूर्तास सविस्तर बोलता येणार नाही. पण याचा आमच्या महाआघाडीवर विपरीत परिणार होणार नाही याची ग्वाही देतो.-शरद यादव, अध्यक्ष,संजद———————कोटबिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्व पक्ष वेगवेगळे होतील आणि त्यांच्यात समझोता होऊ शकत नाही याची मला पूर्ण कल्पना होती. त्यामुळेच मी जाणूनबुजून सपाच्या ‘डेथ वॉरंट’ वर हस्ताक्षर करू शकत नाही असे म्हटले होते. या संपूर्ण प्रकारानंतर जनता परिवार कधी एकत्र येत होता असे समजण्याचे कारण नाही.रामगोपाल यादवसपाचे प्रवक्ते,महासचिव———————महाआघाडीची ‘स्वाभिमान रॅली’ झाल्यानंतर मुलायम सिंग यांचा स्वाभमान जागा झालेला दिसतोय! महाआघाडी हे बुडणारे जहाज असल्याचे सिद्ध झाले आहे. बुडणाऱ्या जहाजावर राहणे कोणालाच आवडत नसल्याने मुलायम सिंग यांनी त्यातून सर्वप्रथम बाहेर उडी मारली आहे.-सैयद शाहनवाज हुसैन, नेते, भाजपा———————————————-राजद नेते रघुनाथ झा सपामध्येपाटणा: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते रघुनाथ झा यांनी गुरुवारी पक्षाचे पद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षाध्यक्ष लालूप्रसाद यादव ज्येष्ठ नेत्यांना डावलून केवळ आपल्या कुटुंबावरच लक्ष केंद्रित करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजदमधील ब्राह्मण चेहरा मानले जाणारे ७६ वर्षीय झा यांनी यावेळी समाजवादी पार्टीत समावेशाची घोषणाही केली. त्यांनी लालूप्रसाद यादव यांना पत्राद्वारे आपला निर्णय कळविला आहे.