ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - हैदराबाद विद्यापीठातल्या रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर देशातले वातावरण ढवळून निघाले आहे. केवळ एका विद्यार्थ्याने यंत्रणेविरोधात लढताना थकल्यामुळे उचललेले टोकाचे पाऊल इथपर्यंत हे प्रकरण मर्यादित न राहता, जातीचा पैलू त्यात आला. त्यात, रोहितची नक्की जात कोणती, त्याच्या आई वडिलांची जात कोणती हे पैलू चर्चिले गेले. देशात कुठेही काही अघटित घडलं की जाती नी धर्माचे चश्मे लागायला लागले आहेत.
बीबीसी हिंदीने अत्यंत वैगळ्या प्रकारे याकडे बघताना उपहासात्मक स्पर्श देत कार्टूनच्या माध्यमातून देशातली परिस्थिती रेखाटली आहे. सध्या सोशल मीडियावरही हे कार्टून चांगलेच व्हायरल होत आहे.
CARTOON OF THE DAY pic.twitter.com/MA512782q0— BBC Hindi (@BBCHindi) January 20, 2016