ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 4 - माजी न्यायमूर्ती राहिलेले मार्कंडेय काटजू वादग्रस्त विधान करण्यात मश्गुल आहेत. आता त्यांनी बीसीसीआय पदाधिका-यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. बीसीसीआयच्या पदाधिका-यांना नग्नावस्थेत खांबाला बांधून 100 फटके दिले पाहिजेत, असं वादग्रस्त ट्विट करून बीसीसीआयजगतात त्यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.ते पुढे म्हणाले, 'लोढांनी बीसीसीआयला दिलेली वागणूक पुरेशी नाही. लोढांनी खरं तर बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना नग्नावस्थेत खांबाला बांधून शंभर फटके मारायला हवेत, असे ट्विटच्या माध्यमातून मार्कंडेय काटजू म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांची बीसीसीआयच्या सल्लागार समितीवर नेमणूक केल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या चार सदस्यीय समितीत बीसीसीआयचे वकील अभिनव मुखर्जी यांच्यासह अन्य दोन कायदेतज्ज्ञांचा समावेश आहे.
Lodha Committe and @BCCIpic.twitter.com/JWLdKHOZYQ— Markandey Katju (@mkatju) October 4, 2016