एप्रिल महिन्यात उष्णतेने कहर केला आहे. कधी दिवसभर तळपते उन तर कधी सायंकाळी पाऊस यामुळे लोक पुरते हैराण झाले आहेत. असे असताना एक धडकी भरवणारा रिपोर्ट आला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे भारताला उष्णतेच्या लाटेचा फटका जाणवू लागल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. देशातील ९० टक्के भाग उष्माघाताच्या डेंजर झोनमध्ये असल्याचे समोर आले आहे.
उन खूप वाढलेय! उन्हाचा ताप कसा ओळखाल... शरीर देते हे संकेत... सावध रहा, लहान मुलांची, कुटुंबाची काळजी घ्या...केंब्रिज विश्वविद्यालयाच्या रामित देबनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन केले आहे. कमलजीत रे, एसएस रे, आरके गिरी आणि एपी डिमरी या शास्त्रज्ञांसह पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम राजीवन यांनी लिहिलेल्या रिपोर्टनुसार उष्णतेच्या लाटेमुळे 50 वर्षांत भारतात 17,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 1971 ते 2019 या काळात देशात उष्णतेच्या लाटेच्या 706 घटना घडल्याचे म्हटले आहे.
नवी मुंबईतील महाराष्ट्र सरकारच्या पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने एकाचवेळी 13 जणांचा मृत्यू झाला होता. देशाच्या इतिहासातील आजवरच्या उष्णतेच्या लाटे-संबंधित घटनेतील मृत्यूची ही सर्वाधिक आकडेवारी आहे.
उष्णतेची लाट केव्हा घोषित करतात...उष्णतेची लाट असल्याचे घोषित करण्यासाठी काही अटी आहेत. मैदानी भागात कमाल तापमान किमान 40 डिग्री सेल्सिअस, किनारपट्टीच्या भागात किमान 37 डिग्री सेल्सिअस आणि डोंगराळ भागात किमान 30 डिग्री सेल्सिअस असेल आणि सरासरीपेक्षा हे तापमान किमान 4.5 डिग्री सेल्सिअसने जास्त असेल तर उष्णतेची लाट म्हणून घोषित केले जाते.
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघाताचा कहर, तुम्हालाही त्रास होऊ शकतो...कशी काळजी घ्याल...
1901 पासून भारतात उष्णतेशी संबंधीत माहिती ठेवली जाते. तेव्हापासून आजवर यंदाचा फेब्रुवारी सर्वात उष्ण महिना ठरला आहे. मार्चमध्ये पावसाने हजेरी लावल्याने उष्णता नियंत्रणात राहिली होती. परंतू, यंदाचा एप्रिल तेव्हापासून आजपर्यंतचा सर्वात उष्ण ठरलेला तिसरा महिना आहे. अद्याप एप्रिलचे 10 दिवस बाकी आहेत.