शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
2
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
3
भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
5
'गुडन्यूज कधी देणार?', संभावना सेठला ऐकावे लागताएत टोमणे; म्हणाली, "लग्नात महिलांनी..."
6
"अररियात राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल", भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर व्हायरल
7
बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसची 2025 साठीची भविष्यवाणी, दिला मोठा इशारा!
8
Defence stocks मध्ये मोठी विक्री, Mazagon Dock, GRSE जोरदार आपटले
9
अब्दुलांची भाजपाशी जवळीक वाढली, काश्मीरच्या विधानसभेत दिलं मोठं पद 
10
VIDEO: वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत बाचाबाची; TMC खासदार कल्याण बॅनर्जी जखमी
11
भाजपाला धक्का! माजी मंत्र्यांनी हाती घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपाच्या बैठका सुरू, निवडणुकीनंतर एकत्र येणार"; बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
13
IND vs NZ 2nd Test : पुणे कसोटीसाठी भारताची रणनीती ठरली? एक महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता
14
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
15
MVA Seat Sharing: उद्धव ठाकरे-बाळासाहेब थोरातांमध्ये अडीच तास काय झाली चर्चा?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"५ कोटी पकडले पण बाकीचे पैसे आमदारांच्या घरापर्यंत पोहचवले", रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
17
दोन मुली एकाच मुलाच्या पडल्या प्रेमात, कुटुंबीय अडथळा ठरत असल्याने गेले पळून, अखेर...  
18
भयंकर! आईने ५० रुपये न दिल्याने 'त्याने' रागाच्या भरात आजीला बाल्कनीतून खाली फेकलं अन्...
19
Madhabi Puri-Buch : SEBI च्या अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना सरकारकडून क्लीन चिट; कार्यकाळ पूर्ण करणार का?
20
BSNL ची नवी सुरुवात; नवा LOGO पाहिलात का? सोबतच ७ नव्या सेवा, हाय स्पीड इंटरनेटही

या गावांमध्ये सिगारेट ओढाल तर खबरदार...! घरांना आग लागण्यासारखे प्रकार टाळण्यासाठी उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 5:51 AM

उत्तराखंड येथील जोशीमठ येथे भूस्खलनामुळे कित्येक घरे व इमारतींना तडे गेले आहेत. त्यामुळे धोकादायक अवस्थेतील काही घरे पाडावी लागली.

डेहराडून : उत्तराखंड येथील जोशीमठ येथे भूस्खलनामुळे कित्येक घरे व इमारतींना तडे गेले आहेत. त्यामुळे धोकादायक अवस्थेतील काही घरे पाडावी लागली. मात्र, या राज्यात गंगाड, ओसला यासारख्या पाच गावांमध्ये संपूर्ण लाकडी घरे असून, भूकंपाचा धक्का बसला तरी त्यांचे मोठे नुकसान होत नाही. पर्यायाने जीवितहानीदेखील टळते. मात्र, या गावांमध्ये रहिवाशांना धूम्रपानावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे घरांना आग लागण्यासारखे प्रकार सहज टाळता येतात.

लाकडांनी बांधलेल्या घरांच्या वास्तुशैलीला ‘कोटी बनाल’ असे म्हणतात. ही घरे देवदार वृक्षांच्या लाकडांनी बांधण्यात येतात. भूकंपाचा मोठा धक्का बसला तरी या घरांचे फार नुकसान होत नाही. त्यामुळे वित्त व जीवितहानीचे प्रमाणही खूप कमी होते. लाकूडकाम असल्याने या घरांचे आगीपासून संरक्षण करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे या गावातील रहिवाशांनी धूम्रपान करण्यावर तेथील ग्रामपंचायतींनी बंदी घातली आहे. सिगारेट ओढल्यास दंड आकारण्यात येतो. (वृत्तसंस्था)

प्राचीन कोटी बनाल वास्तुशैलीलाकडाचा वापर करून घरे बांधण्याची ‘कोटी बनाल’ वास्तुशैली काही हजार वर्षे जुनी असल्याचे गंगाड, ओसला आदी पाच गावांतील जाणकार सांगतात. ही घरे तीन ते चार मजल्यांची असतात. त्यातील तळमजला गुरांचा गोठा म्हणून वापरण्यात येतो. पहिल्या मजल्यावर बकऱ्या ठेवण्यात येतात. दुसऱ्या मजल्यावर त्या घरातील सदस्य राहतात. तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावर धान्यसाठा व इतर सामान ठेवलेले असते. 

१९९१च्या भूकंपात लाकडी घरांचे झाले नाही नुकसानउत्तराखंडमध्ये १९९१ साली भूकंपाचा मोठा धक्का बसला होता. मात्र त्यात गंगाड, ओसलासह पाच गावांतील लाकडी घरांचे फारसे नुकसान झाले नाही. देवदार वृक्षाचे लाकूड पाऊसपाणी, वारा, बर्फ आदींचा मारा सहन करत सुमारे ९०० वर्षे टिकते असे मानले जाते. तसेच या लाकडाने बांधलेली घरे भूंकपरोधकही असल्याने त्यात राहाणारे लोकही सुरक्षित असतात.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडJara hatkeजरा हटकेHomeसुंदर गृहनियोजन