शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

सावधान... इंटरनेटवर पॉर्न सर्च करताय? सर्च करताच १०९० वर पोलिसांकडे जाणार SMS 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 1:31 PM

ऑनलाईन पॉर्न कंटेन्ट सर्च करतानाच १०९० कडून येणार अलर्ट मेसेज

ठळक मुद्देऑनलाईन पॉर्न कंटेन्ट सर्च करतानाच १०९० कडून येणार अलर्ट मेसेजसर्च करणाऱ्याची माहितीही स्टोर होणार

महिलांसोबत गैरव्यवहार करणाऱ्यांवर आता लगाम घालण्याच्या निर्णय पोलिसांनी घेतला आहे. महिलांसोबत अश्वील कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. महिलांसोबत कोणीही अश्लील कृत्य केलं तर त्याच्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीनं लक्ष ठेवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश सरकारनं १०९० ही सेवा सुरू केली आहे. या द्वारे पोलीस अशा लोकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करणार आहेत जे अशा प्रकारची कृत्य करू शकतात. यासाठी सरकार आणि पोलीस इंटरनेट माध्यमाचा वापर करणार आहे. ऑनलाईन अश्लील बाबी सर्च केल्यास संबंधिता १०९० सावधान होण्याचा अलर्ट देईल. त्यानंतर ही माहिती १०९० वरदेखील दाखल होणार आहे."इंटरनेटचा वाढता वापर पाहता १०९० नं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याच माध्यमाचा वापर केला. उत्तर प्रदेशात डिजिटल चक्रव्ह्यू (महिला सुरक्षेसाठी ३६० डिग्री इकोसिस्टम) साठी एक डिजिटल आऊटरिच रोडमॅप तयार केला आहे," अशी माहिती १०९० मध्ये आयोजित एका कार्यक्रमात एडीजी नीरा रावत यांनी दिली. "सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट अंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. यामध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे. आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे सुरू करण्यात येणार आहे. राज्यात जवळपास ११.६ कोटी इंटरनेट युझर्स आहेत. मुख्य रूपानं ते सर्वच १०९० च्या टार्गेटमध्ये आहेत. महिलांच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम आयडीवर सुरक्षेशी निगडीत मेसेज आणि तरूणांना इशारा देणारा मेसेज पाठवण्यात येणार आहे," असंही त्यांनी यावेळी सांगितलं."या संपूर्ण योजनं नाव आमची सुरक्षा असं ठेवण्यात आलं आहे. या अंतर्गत सर्व इंटनेट युझर्सपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. टप्प्याटप्प्यानं ही योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे. १०९० ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असेल आणि निरनिराळ्या सोशल मीडिया युझर्सपर्यंत याबाबत माहिती पोहोचवली जाईल. सोशल मीडियावरू पाठवण्यात येणारे संदेशही तयार करण्यात आले आहेत," असं नीरा रावत म्हणाल्या.

टॅग्स :PoliceपोलिसonlineऑनलाइनInternetइंटरनेटSocial Mediaसोशल मीडिया