शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

सावधान, सिम स्वॅपिंगने चोर रिकामी करू शकतात तुमचे बँक खाते!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 5:32 AM

हल्ली स्मार्ट फोनशिवाय कुणाचे पानही हलत नाही, परंतु थोडासा निष्काळजी केल्यास ही सवय महागात पडू शकते. चोर तुमच्या सिम कार्डमधील सर्व माहिती क्लोन वा स्वॅपद्वारे मिळवून तुमचे बँक खाते रिकामी करू शकतो.

नवी दिल्ली : हल्ली स्मार्ट फोनशिवाय कुणाचे पानही हलत नाही, परंतु थोडासा निष्काळजी केल्यास ही सवय महागात पडू शकते. चोर तुमच्या सिम कार्डमधील सर्व माहिती क्लोन वा स्वॅपद्वारे मिळवून तुमचे बँक खाते रिकामी करू शकतो. ते ही अगदी काही मिनिटांत!सायबर चोरांनी चोरीसाठी ही शक्कल शोधली आहे. कोणत्याही कंपनीचे सिम सायबर चोर सहजपणे स्वॅप करू शकतात. त्यामुळे अनोळखी व्यक्तीशी बोलताना केलेली छोटीशी चूक मोठा आर्थिक फटका देऊ शकते. त्यामुळे एखाद्या टेलिकॉम कंपनीच्या नावे फोन आला आणि समोरच्या व्यक्तीने सिम कार्ड नंबर विचारला, तर तो सांगू नका. लक्षात ठेवा की, कोणत्याही कंपनीचा अधिकारी अशी खासगी माहिती कधीही मागत नाही. कोणी अशी माहिती विचारत असेल, तर ही धोक्याची घंटा समजावी.काय आहे सिम स्वॅपिंग?यात एखाद्या सिम कार्डचे डुप्लिकेट कार्ड तयार केले जाते. कॉल करणारा आपण सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून बोलत असल्याचे सांगून कॉल ड्रॉप, इंटरनेट स्पीड आदी त्रुटी दूर करण्याची बतावणी करीत तुमची माहिती काढून घेतो.बोलण्यातून ती व्यक्ती युजरचा २० डिजिटचा युनिक नंबर मिळवतो. जो सिम कार्डच्या मागे असतो. त्यानंतर, १ नंबर प्रेस करण्यास सांगितले जाते. ही प्रक्रिया पूर्ण होताच, तुमच्या सिमचे स्वॅपिंग केले जाते. त्यानंतर तुमच्या मोबाइलवर सिग्नल येणे बंद होते व याच नंबरच्या दुसऱ्या सिममध्ये सिग्नल येतात, जे फोन करणाºया व्यक्तीकडे असते.बहुतांश प्रकरणात स्कॅमरकडे आपला बँकिंग आयडी आणि पासवर्ड असतो. आता त्यांना ओटीपीची गरज असते. तो सिम नंबरवर येतो. ओटीपी येताच आपल्या बँक अकाउंटमधून रक्कम ट्रान्सफर केली जाते.युरोप व अमेरिकेत २०१३मध्ये सिम स्वॅपिंगच्या अनेक घटना घडल्या. भारतातही सिम स्वॅपिंगने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खात्यातून काढले आहेत. हा सायबर क्राइमचा प्रकार आहे.

टॅग्स :bankबँक