शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सावध व्हा, येणार थंडीची लाट! उत्तर आणि मध्य भारताला भरणार हुडहुडी, हवामान खात्याने दिला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 8:51 AM

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी जानेवारी-फेब्रुवारी-मार्च कालावधीत सामान्य पावसाचा देखील अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात गव्हाच्या पिकाच्या चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 

नवी दिल्ली : नव्या वर्षाचे नागरिकांनी माेठ्या उत्साहात स्वागत केले. मात्र, उत्तर भारतातील अनेक भागात नव्या वर्षाचा पहिलाच दिवस गेल्या चार वर्षांतील गारेगार ठरला. उत्तर भारतातील अनेक 

राज्यांना थंडीमुळे हुडीहुडी भरली आहे. विशेषत: पंजाब, हरयाणा या भागात तापमान घसरले आहे. जम्मू- काश्मिरसह, हिमाचल प्रदेशात पर्यटक हिवाळ्याचा आनंद लुटत असल्याचे चित्र आहे. तथापि, मध्य भारतात जानेवारीत थंडी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

पंजाब आणि हरयाणाच्या अनेक भागांमध्ये सोमवारी थंड हवामान होते. पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये किमान ६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पहाटे दोन्ही राज्यांमध्ये काही ठिकाणी धुकेही दिसून आले. 

जानेवारीमध्ये पारा घसरणार - भारतीय हवामान खात्याने देशाच्या मध्यवर्ती भागात जानेवारीत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. पुढील तीन दिवस उत्तर-पश्चिम आणि पूर्व भारताच्या काही भागात दाट धुके राहण्याचा देखील अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी जानेवारी-फेब्रुवारी-मार्च कालावधीत सामान्य पावसाचा देखील अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात गव्हाच्या पिकाच्या चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 

तापमान शून्याच्या खाली, तरीही नववर्षाचा जल्लाेषश्रीनगरमध्ये शून्यापेक्षा कमी तापमान असूनही, शेकडो स्थानिक लोक व पर्यटकांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला लाल चौकातील प्रतिष्ठित क्लॉक टॉवरवर गर्दी केली होती, असे दृश्य यापूर्वी कधीही दिसले नव्हते, असे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. स्थानिक लोक आणि पर्यटकांनी नववर्षाचा आनंद लुटला.

कुठे किती अंशांपर्यंत उतरला पारा?फरीदकोटमध्ये ८ अंश सेल्सिअस, लुधियानामध्ये ८.२ अंश सेल्सिअस आणि अमृतसरमध्ये ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दोन्ही राज्यांची राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हरयाणातील कर्नाल येथे ८.१ अंश सेल्सिअस तर हिस्सार, नारनौल आणि भिवानी येथे अनुक्रमे ८.३, ८.८ आणि ८.३ अंश सेल्सिअस तापमान हाेते.

गेले वर्ष १२२ वर्षांतील सर्वात उष्ण- महापात्रा म्हणाले की, २०२३ हे १९०१ नंतरचे दुसरे सर्वात उष्ण वर्ष होते. कारण देशातील वार्षिक सरासरी तापमान सामान्यपेक्षा ०.६५ अंश सेल्सिअस जास्त होते. १९०१ नंतरचे सर्वात उष्ण वर्ष २०१६ नाेंदविले होते. - तेव्हा देशातील वार्षिक सरासरी हवेचे तापमान सामान्यपेक्षा ०.७१ अंश सेल्सिअस जास्त होते. देशाच्या बहुतांश भागांमध्ये सकाळी तुलनेने उष्णतेची अपेक्षा आहे. - मध्य आणि वायव्य भागांमध्ये थंड दिवसांचा अनुभव येईल. कारण हवामान विभागाने या प्रदेशात सामान्य कमाल तापमानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  

टॅग्स :weatherहवामान