शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
2
"जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो..."; उद्धव ठाकरेंची पुन्हा 'भगवी' साद, मनात नेमकं काय?
3
मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार; सरकारची डोकेदुखी वाढणार?
4
हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
5
गणपती निघाले गावाला... मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज
6
दीपिकाचा एकही सिनेमा पाहिला नाही, नवाजुद्दीन सिद्दीकीचं आश्चर्यकारक विधान; 'स्त्री'बद्दल म्हणाला...
7
Stock Market Opening: US फेडच्या बैठकीपूर्वी शेअर बाजारात बुलिश ट्रेंड, 'ही' लेव्हल पार केली तर येऊ शकते मोठी तेजी
8
"अशा पद्धतीने माणसांना अपमानित करून बाहेर काढणे हेच 'नवं शैक्षणिक धोरण' आहे का?"
9
Dolly Chaiwala : 'डॉली चायवाला'ची फी ऐकून फुटेल घाम! मॅनेजर ठरवतो डील्स; मागण्यांचीही मोठी यादी
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी-व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक!
11
कोण आहे अमानत? जी होणार केंद्रीय कृषिमंत्र्यांची मोठी सून; चौहान कुटुंब आनंदात
12
आता अरबाज घराबाहेर जाईल! नॉमिनेशन टास्कनंतर अभिजीतचं स्पष्ट मत, म्हणतो- "तो फक्त निक्कीच्या..."
13
परीक्षांच्या तारखा जाहीर करा, शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
14
गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार
15
'बिग बॉस मराठी'नंतर 'बिग बॉस हिंदी'चा नवा सीझन येणार, सलमानच्या आवाजातील प्रोमो समोर, थीमही आहे खास
16
‘राजपुत्र’ विधानसभेत नशीब अजमावणार? विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली
17
अवघड गणित होणार सोपे! शिक्षण विभाग शाळांमध्ये राबविणार गणित सात्मीकरण प्रणाली
18
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
19
‘कुनो’मध्ये परदेशी पाहुण्यांची होतेय हेळसांड; सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत
20
Pitru Paksha 2024: पितृपक्ष संकल्पना केवळ भारतात नाही तर चीन, जपानमध्येही करतात श्राद्धविधी!

सावध व्हा; तुमच्या मुलांना असू शकतो मधुमेह! ‘एनसीबीआय’च्या संशोधनातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 8:12 AM

अगदी लहान वयात मधुमेह झाल्यामुळे मुलांच्या दैनंदिन जीवनात अनेक बदल होत असतात.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बदलत्या खाण्याच्या सवयी, जीवनशैली आणि कुटुंबात आजार  असल्यामुळे लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. अगदी लहान वयात मधुमेह झाल्यामुळे मुलांच्या दैनंदिन जीवनात अनेक बदल होत असतात.

एनसीबीआय (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन) च्या अभ्यासानुसार १४.७ टक्के मुलांना मधुमेह आहे. अभ्यासात १ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना घेण्यात आले, ज्यामध्ये बहुतेक मुलांना पहिल्या प्रकाराचा (टाइप १) मधुमेह असल्याचे आढळून आले.

पालकांची बंधने ठरतात घातक

काही वेळा पालकही मधुमेही मुलाशी सामान्यपणे वागत नाहीत. त्यांना इतर मुलांबरोबर खेळू देत नाहीत किंवा आजारी असल्याचे सांगून त्यांच्या शारीरिक हालचालींवर बंधने घालतात. त्यामुळे मुलांना खूप एकटेपणा जाणवतो. हळूहळू ते स्वतःला समाजापासून, मित्रांपासून दूर करतात. कोणाशी बोलत नाहीत व गप्प बसू लागतात. त्यांच्या मनात नेहमी नकारात्मक विचार येतात. त्यामुळे ते नैराश्य, तणावाचे शिकार होतात.

लहान मुलांत मधुमेहामुळे बदल

- मधुमेह असलेली मुले लहान वयातच चिडखोर होतात, इतर मुलांच्या तुलनेत त्यांना लवकर राग येतो. - या मुलांत तणाव आणि नैराश्यही वाढते. - शाळेत त्यांना इन्सुलिन इंजेक्शन्स घेण्यासाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांकडे जावे लागते, ज्यामुळे त्यांच्यात वेगळेपणाची भावना येते.

काय कराल?

- मुलांना मधुमेह झाला तर आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, मधुमेह असूनही त्यांच्या क्षेत्रात यश संपादन केलेल्या यशस्वी व्यक्तींची उदाहरणे द्या.- मुलांना संपूर्ण आहार द्या. - जर गोड खाण्याची इच्छा असेल तर मुलांना ‘ग्लुटेन फ्री’ मफिन्स, डार्क चॉकलेट द्या.

फास्ट फूडचे आकर्षण

मुलांना चॉकलेटपेक्षाही फास्ट फूड खाण्याची खूप इच्छा होते. पण डायबिटीसमुळे पालक मुलांना जंक फूड खाण्यापासून थांबवतात तेव्हा ते खूप चिडखोर, आक्रमक होतात.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह