शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

ग्राहकांशी साैजन्याने वागा; स्टेट बॅंक अधिकाऱ्यांना हायकोर्टाने झापले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 9:51 AM

ग्राहकांशी साैजन्याने वागा; त्यांच्यामुळेच मिळतो पगार

ठळक मुद्देशपथपत्रावरून न्या. सुब्रमण्यन यांनी एसबीआयच्या अधिकाऱ्यांना खडे बाेल सुनावले. ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील वक्तव्य बेजबाबदार मानले पाहिजे

चेन्नई : मुद्रांकांवरील अतिरिक्त शुल्क आकारणीबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने दाखल केलेल्या शपथपत्रातून मांडलेल्या भूमिकेवरून उच्च न्यायालयानेबँकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.  ग्राहकांशी साैजन्याने वागा, त्याचाच तुम्हाला पगार मिळतो असे खडे बाेल मद्रास उच्च न्यायालयाने सुनावले आहे. मुद्रांक विक्रेत्यांना ट्रेझरी चलान बँकेत भरावे लागते. त्यासाठी एसबीआयकडून राेख जमा करण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येते. त्यास मुद्रांक विक्रेत्यांनी न्यायालयात आव्हान दिले हाेते. हे शुल्क बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी एसबीआयतर्फे एक शपथपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. मुद्रांक विक्रेते चालान भरण्यासाठी इतर बँकेचा पर्याय वापरण्यास स्वतंत्र आहेत, असे शपथपत्रात म्हटले आहे. या भाषेवरून न्यायालयाने संताप व्यक्त केला.

शपथपत्रावरून न्या. सुब्रमण्यन यांनी एसबीआयच्या अधिकाऱ्यांना खडे बाेल सुनावले. ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील वक्तव्य बेजबाबदार मानले पाहिजे. एसबीआय ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. बँकेतील अधिकारी जनतेचे सेवक आहेत. याचिकाकर्ते ट्रेझरी चालानच्या माध्यमातून सरकारी खात्यातच पैसे जमा करतात. मात्र, बँक अधिकाऱ्यांचे वक्तव्य त्यांच्या प्रशासनिक अहंकाराचे दर्शन घडवीत आहे. लाेक प्रशासनाला यातून एकप्रकारे धमकीही देण्यात आली आहे, असे न्या. सुब्रमण्यन म्हणाले.देशातील बँका विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कर्मचारी व अधिकारी ग्राहकांशी उद्दामपणे वागतात, अशी सर्वसाधारण तक्रार असते. त्याबाबतच मद्रास उच्च न्यायालयाने स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. 

टॅग्स :bankबँकChennaiचेन्नईHigh Courtउच्च न्यायालय