- संजय शर्मानवी दिल्ली : संसदेच्या पाचदिवसीय विशेष अधिवेशनात सरकार व विरोधी पक्षांमध्ये धुमशान होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टी व काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपापल्या खासदारांना व्हिप जारी करून संसदेत हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन संसदेचा औपचारिक श्रीगणेशा १९ सप्टेंबरला गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर होणार आहे. परंतु १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जन्मदिनी नवीन संसदेवर तिरंगा फडकावून संसद भवनात कामकाज स्थलांतरित करणार आहेत.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकारने बोलावलेले संसदेचे विशेष अधिवेशन निवडणुकीच्या आखाड्यात बदलू शकते. भाजप व काँग्रेसमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थानमध्ये थेट लढाई होणार आहे. त्याचा थेट परिणाम या अधिवेशनात दिसणार आहे. याबाबतचे संकेत देत काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रश्न उपस्थित करताना म्हटले आहे की, असा कोणता अजेंडा आहे, ज्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले जात आहे? जी विधेयके संसदेत सादर केली जाणार आहेत, त्यात असे कोणतेही विधेयक नाही, ज्यासाठी सरकार हिवाळी अधिवेशनापर्यंत थांबू शकले नसते.
प्रश्नकाळ नसणारसंसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की, यात ना प्रश्नकाळ नसेल. म्हणजेच खासदार प्रश्नोत्तरेही विचारू शकणार नाहीत. शून्यकाळही नसेल. म्हणजेच खासदार कोणताही मुद्दा उपस्थित करू शकणार नाहीत.