'गप्प बसा, अन्यथा...' डॉक्टरांचा सिद्धूंना भाषणं न करण्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 05:45 PM2018-12-06T17:45:21+5:302018-12-06T17:46:08+5:30
सिद्धू यांच्या रक्ताच्या नमून्याची चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये गंभीर आणि धोकादायक परिणाम दिसून आला.
नवी दिल्ली - आपली अफलातून शेरोशायरी, हटकेस्टाईल कॉमेंट्री अन् बेधडक भाषणाबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू यांना डॉक्टरांना गप्प बसण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रस नेते आणि मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात सिद्धू यांनी निवडणुकांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. आपल्या शेरोशायरीसह सभांचा झंझावत दौरा केला. मात्र, या दौऱ्यामुळे सिद्धूंच्या घशावर ताण बसला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सिद्धू यांना 5 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
सिद्धू यांच्या रक्ताच्या नमून्याची चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये गंभीर आणि धोकादायक परिणाम दिसून आला. त्यामुळे सिद्धू सध्या शरीर स्वास्थतेसाठी एका अज्ञात ठिकाणी आहेत. तेथे, श्वास घेण्यापासून ते इतरही शारिरीक हालचालीसंदर्भात त्यांना कसरती कराव्या लागत आहेत. तसेच फिजिओथेरपीसोबत विशिष्ट औषधांचीही पूर्तता केली जात आहे. गेल्या 17 दिवसांपासून सिद्धू निवडणूक प्रचारांच्या दौऱ्यावर होते.
तेलंगणा आणि राजस्थानमध्ये काँग्रेच्या प्रचारार्थ सिद्धू यांनी अनेक सभा घेतल्या आहेत. तर, करतारपूर आणि इम्रान खान यांच्या वक्तव्याबद्दलही सातत्याने सिद्धू यांना मीडियाच्या प्रश्नांन तोंड द्यावे लागत आहे. सातत्याने भाषण आणि बडबड यामुळे सिद्ध यांच्या वोकल कॉर्ड्सवर विपरीत परिणाम झाला आहे. तर, डॉक्टरांकडे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी ही गंभीर बाब असल्याचे सांगत त्यांना 5 दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.