शहरं
Join us  
Trending Stories
1
महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा 
2
"नव्या जोडप्यांनी 16-16 मुलं जन्माला घालावीत, कारण..."; CM चंद्रबाबूंनंतर, आता स्टॅलिन यांचंही अजब आवाहन
3
ठाकरे गटात अन् काँग्रेसमध्ये किती जागांसाठी वाद? ‘मविआ’तील नेत्याने सगळेच सांगितले
4
काँग्रेस पोटनिवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा एकटी लढण्याची शक्यता
5
मदरसे बंद करण्याची NCPCR ची शिफारस; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
6
ICU मध्ये प्रवेश न दिल्याने भाजपा आमदाराच्या भावाची दादागिरी; कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण
7
परी म्हणू की सुंदरा... तिच्या जबरदस्त खेळाने प्रतिस्पर्धी, तर सौंदर्याने चाहते घायाळ
8
“कोणताही विभाग हा एका पक्षाचा नसतो”; ठाकरे गट-काँग्रेस वादावर संजय राऊत स्पष्टच बोलले
9
करन जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'ला मिळणार अदर पूनावालांचा 'बूस्टर', विकत घेणार अर्धा हिस्सा
10
मी मरता मरता वाचलो! मराठी अभिनेत्याने सांगितला घोडबंदर रस्त्यावरील जीवघेणा प्रसंग, राजकारण्यांना लगावला टोला
11
बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?
12
मोदी सरकारमध्ये शिवराजसिंह चौहान यांचं वजन वाढलं! पंतप्रधान मोदींनी दिली मोठी जबाबदारी
13
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
14
'या' हिरो बाईकने विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले; ही नावे आहेत टॉप-5 मध्ये...
15
दिवाळीपूर्वी NTPC च्या शेअरधारकांसाठी मोठं गिफ्ट! कंपनी देणार Dividend, रेकॉर्ड डेट काय?
16
३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य
17
‘गण गण गणात बोते’चा नेमका अर्थ काय? गजानन महाराजांनी मंत्र का दिला? अखंड जपाने मिळेल पुण्य
18
मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा
19
आखाती देशांमध्ये १३ हजार लोकांचे नेटवर्क, हवालाद्वारे निधी... पीएफआय संदर्भात ईडीचा मोठा खुलासा
20
धक्कादायक! कोट, स्टेथोस्कोप... महिलेला डॉक्टर होण्याचे 'वेड'; डिग्रीशिवाय करत होती उपचार

महिलांची बदली करताना सहानुभूती बाळगा, केरळ हायकोर्टाने संस्थांना दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 6:26 AM

बदलीनंतर महिलांना कुटुंब व नोकरी यात संतुलनासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यांना सामाजिक संबंध, यंत्रणा यांच्याबद्दल तणाव जाणवतो.

एर्नाकुलम : केरळउच्च न्यायालयाने सोमवारी नोकरदार महिलांची बदली करताना संस्थांना सहानुभूती दाखवण्यास सांगितले. नोकरदार महिला कुटुंबाची काळजी घेतात. त्या त्यांच्या मुलांची आणि वृद्ध पालकांची काळजी घेतात. नवीन ठिकाणी बदली झाल्यानंतर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, असेही खंडपीठाने म्हटले आहे.

बदलीनंतर महिलांना कुटुंब व नोकरी यात संतुलनासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यांना सामाजिक संबंध, यंत्रणा यांच्याबद्दल तणाव जाणवतो. त्यांच्या करिअरच्या प्रगतीतही अडथळे येऊ शकतात. अशा परिस्थितीत नोकरी देणारी व्यक्ती किंवा संस्था महिलांप्रति संवेदनशील असायला हवी, असे कोर्टाने म्हटले. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?आपल्या बदली विरोधात दोन महिला डॉक्टरांनी केरळउच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांची एर्नाकुलममधील कर्मचाऱ्यांच्या राज्य विमा निगम रुग्णालयातून कोल्लममधील कर्मचाऱ्यांच्या राज्य विमा निगम रुग्णालयात बदली करण्यात आली. या दोन्ही महिलांनी यापूर्वी त्यांच्या बदलीच्या आदेशाला न्यायाधिकरणात आव्हान दिले होते. मात्र, न्यायाधिकरणाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. दोन्ही महिलांनी सांगितले होते की, त्यांना त्यांची मुले आणि वृद्ध आई-वडिलांची काळजी घ्यावी लागते.

बदलीमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणामत्यांचे पती इतर ठिकाणी नोकरी करत असल्याने त्यांना त्यांच्या पत्नीसोबत राहणे शक्य नाही. बदलीमुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होईल, शैक्षणिक सत्राच्या मध्येच मुलांना प्रवेश मिळणे कठीण होईल, नोकरदार महिला त्यांच्या घरात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या बदलीचे आदेश काढताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, असे निर्देश न्यायालयाने दिले.

असा पडतोय भार...या स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. तिला १७ आणि ६ वर्षांची दोन मुले आहेत. ज्यांना दमा आहे. मोठा मुलगा अकरावीचा विद्यार्थी आहे. आपल्या ८९ वर्षांच्या आईची काळजी घेण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. दुसरी महिला डॉक्टर जनरल सर्जन आहे. तिला ७ वर्षांचे एक मूल असून, तिचा पती बंगळुरू येथे काम करतो. तिच्या आईला सतत चक्कर येते आणि तिला नेहमी काळजी घ्यावी लागते.

टॅग्स :WomenमहिलाHigh Courtउच्च न्यायालयKeralaकेरळ