शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

हिमवृष्टीने गुलमर्गचे सौंदर्य खुलले

By admin | Published: February 03, 2015 2:10 AM

काश्मीर खोऱ्यातील प्रसिद्ध गुलमर्ग स्काय रिसोर्टवर पर्यटकांनी गर्दी केली असून लागोपाठ दुसऱ्या दिवशी अधूनमधून होणाऱ्या हिमवृष्टीने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे.

पर्यटक आनंदित : स्काय रिसोर्टवर गर्दी; बर्फाचा दीड फुटाहून मोठा थर, व्यवसायात वाढश्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील प्रसिद्ध गुलमर्ग स्काय रिसोर्टवर पर्यटकांनी गर्दी केली असून लागोपाठ दुसऱ्या दिवशी अधूनमधून होणाऱ्या हिमवृष्टीने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. पर्यटकांच्या आगमनासोबतच व्यवसायाने जोर धरल्यामुळे स्थानिक रहिवाशीही खुश झाले आहेत. गुलमर्ग भागात गेल्या दोन दिवसांत दीड फुटापेक्षा जास्त बर्फ जमा झाला आहे. सकाळी ८.३० वाजेपर्यंत ४५.७ सें.मी. बर्फ पडल्याचे हवामान विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.गुलमर्गची हिमवृष्टी विदेशी पर्यटकांसाठी विशेषत: स्कायर्ससाठी खास आकर्षण ठरते. गेल्या दोन दिवसांत या रिसोर्टवरील तापमान किंचित वाढले असून उणे ६ अंशावरून उणे ४.२ अंश सेल्सिअसवर गेले आहे. दक्षिण काश्मिरातील पहलगाम हा अमरनाथ यात्रेकरूंचा तळ मानला जातो.या ठिकाणचे तापमान उणे ३.४ अंश सेल्सियसवरून उणे ०.६ पर्यंत वाढले आहे. रविवारी रात्री पहलगामला ८.६ सें.मी. बर्फ पडला. दक्षिण काश्मिरातील कोकेर्नाग हिल रिसोर्टवर २ सें.मी. बर्फवृष्टीची नोंद झाली. (वृत्तसंस्था)कारगिल सर्वाधिक थंड, २४ तासांत जोरदार हिमवृष्टीचा इशारालडाखमधील कारगिल भागात शनिवारची रात्र सर्वाधिक थंड ठरली. तेथे उणे १४ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले होते. त्या तुलनेत रविवारी रात्री थोडे जास्त उणे ११.४ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. हवामान विभागाने जम्मू-काश्मीरमध्ये येत्या २४ तासांत जोरदार हिमवृष्टी किंवा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणेला सतर्क केले आहे.