शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

‘बजरंगबली’मुळे भाजपची नव्हे, काँग्रेसची नौका पार; भाजप-जेडीएसच्या ७५ जागा काँग्रेसने हिसकावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 6:47 AM

काँग्रेसने ८० नवीन जागा जिंकल्या, त्यांपैकी ७५ जागा भाजप-जेडीएसकडून हिसकावून घेतल्या. कर्नाटकातील ६ पैकी ४ विभागांमध्ये काँग्रेस आघाडीवर, तर भाजपने २ विभागांत बाजी मारली. 

बंगळुरू : कर्नाटक निवडणुकीत ‘बजरंग बली’ भाजपला मदत करू शकले नाहीत; मात्र काँग्रेसला बहुमत मिळून त्यांची नौका मात्र पार झाली. कर्नाटकातील विधानसभेच्या २२४ जागांपैकी काँग्रेसने १३५ जिंकल्या. भाजप ६६ आणि जनता दल धर्मनिरपेक्षला (जेडीएस) १९ जागांवर समाधान मानावे लागले. २०१८ च्या तुलनेत यंदा काँग्रेसने ८० नवीन जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने ८० नवीन जागा जिंकल्या, त्यांपैकी ७५ जागा भाजप-जेडीएसकडून हिसकावून घेतल्या. कर्नाटकातील ६ पैकी ४ विभागांमध्ये काँग्रेस आघाडीवर, तर भाजपने २ विभागांत बाजी मारली. ...तर लोकसभेलाही फटकाराज्यात लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत. २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने यापैकी १५ जागा जिंकल्या होत्या. प्रत्येकी एक जागा काँग्रेस आणि जेडीएसच्या खात्यात गेली होती, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. आकडेवारीवर नजर टाकल्यास लोकसभेच्या २० जागांवर काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. याचा अर्थ या २० लोकसभा जागांच्या अंतर्गत येणाऱ्या जागांवर काँग्रेसने भाजप उमेदवारांचा वाईट पद्धतीने पराभव केला आहे. तीन जागांवर तुल्यबळ लढत आहे. भाजप चार जागांवर, तर जेडीएस एका जागेवर मजबूत दिसत आहे. लोकसभेत असेच निकाल लागले तर भाजपला २१ जागा गमवाव्या लागू शकतात.

कोणत्या आमदाराकडे किती संपत्ती ?(कोटींमध्ये) कॉंग्रेस     डी. के. शिवकुमार    १,१४९     सुरेश बी. एस.    ५३३    एन. ए. हरीश    ४११    रघुनाथ देशपांडे     ३४९    एस. शिवशंकराप्पा     २९५  भाजप      एच. के. सुरेश    ४२३     उदय गरुडाचर    १९३     मुनीरत्न    १९१     निखील उमेश कट्टी     १२२     बी. ए. बसवराज    ९९  जेडीएस     एम. आर. मंजुनाथ    २५५    एच. डी. कुमारस्वामी    १३३    एच. टी. मंजू    ६६    समृद्धी मंजूनाथ    ४२

इतर राज्यांतील निवडणुकांंमुळे पारा आणखी तापणारकर्नाटकातील निवडणुका संपल्या आहेत; परंतु यावर्षी इतर राज्यांतील निवडणुकांच्या मालिकेमुळे २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत राजकीय वातावरण तापलेलेच राहणार आहे. लोकसभा निवडणुकीसोबत किमान तीन विधानसभा निवडणुकाही होऊ शकतात. कर्नाटकपाठोपाठ यंदा मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरममध्ये निवडणुका होणार आहेत. 

नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या पूर्वोत्तर राज्यांमध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणामध्ये २०२३ च्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ यावर्षी डिसेंबरमध्ये आणि पुढील वर्षी जानेवारीमध्ये संपणार आहे. 

सध्या या पाच राज्यांत एकाचवेळी निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  नियोजित निवडणुकांव्यतिरिक्त जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातही यावर्षी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि ओडिशाच्या विधानसभेची मुदत पुढील वर्षी जूनमध्ये वेगवेगळ्या तारखांना संपत आहे. या राज्यांतील निवडणुका लोकसभेच्या निवडणुकांसोबतच होण्याची शक्यता आहे.

कुठे कुणाला फायदा? -बंगळुरू विभाग  बंगळुरू आणि आसपासच्या क्षेत्रांत भाजप, काँग्रेस आणि जेडीएस या तिन्ही पक्षांचे उमेदवार आलटून-पालटून जिंकत आले आहेत. २०२३ च्या निकालात या भागात जेडीएसला सर्वाधिक फटका बसला असून, पक्षाच्या ६ जागा कमी झाल्या, तर भाजपच्या ६ जागा वाढल्या.

मुंबई कर्नाटक  लिंगायतबहुल मुंबई कर्नाटक भाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. २०२३ च्या निकालात भाजपने येथे १४ जागा गमावल्या, तर काँग्रेसला १६ जागांचा फायदा झाला आहे.

मध्य कर्नाटक  २०१८ मध्ये भाजपने येथे सर्वाधिक जागा जिंकल्या; परंतु, २०२३ च्या निवडणुकीत भाजपने येथून सर्वाधिक १७ जागा गमावल्या. २०१८ पेक्षा  काँग्रेसने दुपटीहून अधिक जागा जिंकल्या.

किनारपट्टी भाग  भाजपने ५ जागा गमावल्या : या प्रदेशातही भाजपने ५ जागा गमावल्या आहेत आणि काँग्रेसला ५ जागा मिळाल्या आहेत.

हैदराबाद कर्नाटक  या प्रदेशात भाजपच्या जागा १२ वरून ९ पर्यंत कमी झाल्या आहेत आणि काँग्रेसच्या जागा १५ वरून १९ वर आल्या आहेत.

जुने म्हैसूर  जुने म्हैसूरमध्ये जेडीएसने ११ जागा गमावल्या : वोक्कलिंगाचे वर्चस्व असलेला हा भाग जेडीएसचा बालेकिल्ला आहे. २०२३ च्या निकालात जेडीएसला येथून सर्वाधिक फटका बसला. त्यांच्या जागा २४ वरून फक्त १३ वर आल्या आहेत. काँग्रेसला येथे सर्वाधिक फायदा झाला. याच भागात राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केली.

ऑल द बेस्ट : बोम्मईबसवराज बोम्मई यांनी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांना ‘ऑल दी बेस्ट’ म्हणत शुभेच्छा दिल्या. त्यांना मित्र म्हणून काय सांगाल, असा प्रश्न बोम्मई यांना विचारला असता ते ‘दोन्ही नेत्यांना शुभेच्छा,’ असे म्हणाले.

पुढील ५ वर्षे लोकांची मने जिंकापुढील पाच वर्षे सत्य आणि प्रामाणिकपणे भेदभाव न करता लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करावा. कर्नाटक निवडणूक जिंकणे कठीण होते. लोकांची मने जिंकणे त्याहूनही कठीण आहे.  - कपिल सिब्बल, राज्यसभा सदस्य  

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारण