जळगाव : उत्तर महाराष्ट्रस्तरीय पक्षीमित्र संमेलनाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पक्ष्यांचा इतिहास व संवर्धन यासह विविध महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. पक्षी वाचविण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी केवळ पक्षीमित्र राहून चालणार नाही तर निसर्गमित्र व्हावे अशी अपेक्षा संमेलनाच्या दुसर्या दिवशी आयोजित केलेल्या खुल्या सत्रादरम्यान उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.सातपुडा बचाव कृती समितीतर्फे वाघूर परिसरात दोन दिवसीय संमेलनात दुपारी १२ वाजता खुले सत्र घेण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष अभय उजागरे, संयोजक राजेंद्र नन्नवरे, डॉ.सुधाकर कुर्हाडे उपस्थित होते.माकडांचाउपद्रवथांबविण्यासाठीवृक्षतोडदत्तात्रय तावडे यांनी शेती शिवारातील पक्षांची स्थिती याबाबत आपले निरीक्षण नोंदविले. पूर्वी घनदाट जंगल होते. पाणी भरपूर होते. नंतर शेतीचा विकास झाला. विहिरीवर वीजपंप आले. पाण्याच्या प्रचंड उपशामुळे नदी व नाले आटले. त्यामुळे पक्षांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. पूर्वी बैलाद्वारे शेती केली जात होती. त्यावेळी शेतात बांध होते. या बांधावर भरपूर झाडे असल्याने पक्ष्यांचा निवारा त्यावर होता. कालांतराने यांत्रिकीपद्धतीने शेती सुरु झाली. शेताचे क्षेत्र वाढविण्यासाठी बांध गायब झाले. पर्यायाने त्यावरील वृक्षांची तोड झाली. पक्षांचा निवारा हिरावला गेला. शेतातील झाडे घरातील टेबल, खुर्ची, दरवाजा किंवा अन्य वस्तू तयार करण्यासाठी उपयोगात येतील यासाठी वाढवित होता. मात्र लाकडाच्या तुलनेत प्लास्टिक व लोखंडी वस्तू स्वस्त मिळत असल्याने शेतकरी शेतात झाडे ठेवत नाही. शेत आणि वनसंपदेवर पूर्वी शेतकरी सर्वांचा अधिकार मानत होता. त्यामुळे आता शेतात वारंवार येणारी माकडे थांबविण्यासाठी तो वृक्षतोड करीत असल्याचे त्यांनी सांगितले.पक्ष्यांसाठी रेस्क्यू होमची आवश्यकता राजेंद्र स्वामी यांनी संमेलनात पक्ष्यासंबधी माहिती देत असताना त्यांना रोपांचे वाटप केले जावे. जेणेकरून वृक्ष वाढतील आणि पक्षी वाढतील. पक्षीसंवधर्न करण्यासाठी पक्ष्यांसाठी रेस्क्यू होमची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष्यांची तोंडओळख व्हावी यासाठी तज्ज्ञांनी कार्यशाळा घेऊन माहितीचे आदानप्रदान करावे. त्या अनुशंगाने दुसरी साखळी तयार होईल.चिमण्या वाचविण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण घरटे चातक संस्थेचे अनिल महाजन यांनी सद्यस्थितीला ग्रामीण व शहरी भागातील ८० टक्के चिमण्या या नष्ट झाल्या आहेत. चिमण्या वाचविण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण घरटे त्यांनी तयार केले आहे. त्याबाबत माहिती दिली.
पक्षीमित्रासोबतच निसर्गमित्र व्हा पक्षीमित्र संमेलनात सूर : रेस्क्यू हाऊसची गरज; खुल्या सत्रा दरम्यान व्यक्त केली भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2016 10:32 PM