मंत्री होण्यापूर्वी मी सीए होतो, तुम्ही कोण आहात ?, पीयूष गोयल यांचा राहुल गांधींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 05:31 PM2018-05-01T17:31:28+5:302018-05-01T17:31:28+5:30
पदाचा कथित गैरवापर आणि कथित घोटाळ्याच्या आरोपामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा राजीनामा मागणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना गोयल यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
नवी दिल्ली- पदाचा कथित गैरवापर आणि कथित घोटाळ्याच्या आरोपामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा राजीनामा मागणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना गोयल यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. ट्वीटरच्या माध्यमातून पीयूष गोयल यांनी राहुल गांधी यांना चांगलेच सुनावले असून, मी कामदार (कामगार) आहे तर तू नामदार (घराणेशाहीतून आलेल्या पदावरील व्यक्ती) आहात, अशी टीका केली आहे.
26 मे 2014 पर्यंत रोजी मी मंत्री झालो. त्यापूर्वी मी व्यावसायिक सनदी लेखापाल आणि इन्व्हेस्टमेंट बँकर होतो. तुमच्यासारखी काम न करता जगण्याची कला मी साधलेली नाही. मी कामदार आहे, नामदार नाही, अशा तिखट शब्दांमध्ये गोयल यांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे.
Piyush Goyal’s, 48 CR. #FlashNet Scam is about deceit, conflict of interest and greed. The evidence is on the table. Yet, the media will not touch the story.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 1, 2018
It is a tragedy for our country when journalists entrusted to stand for the truth, will not speak.#GoyalMustResignpic.twitter.com/WeUaSAT8wg
इतकेच नव्हे तर पीयूष गोयल यांनी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि कार्ती चिदंबरम यांच्यावरही टीका केली आहे. पुढच्या ट्वीटमध्ये ते लिहितात, मी कायद्याचे शिक्षण घेताना पहिला आलो. सीएच्या परीक्षेत देशात दुसरा होतो. मी व्यावसायिक सनदी लेखापाल आणि इन्व्हेस्टमेंट बँकर आणि आर्थिक सल्ला देण्यासाठी सक्षम आहे. पी. चिदंबरम तुमचा मुलगा कार्ती चिदंबरम याला कोण सल्ले देत आहे? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
Till 26th May 2014, before I became a Minister, I was a professional Chartered Accountant & investment banker. Unlike you, Mr @RahulGandhi, I have not learnt well the art of living without working. I am also a kaamdaar (worker) and not a naamdaar (dynast)
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 1, 2018