शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

बेदींवर वादाचे किरण

By admin | Published: January 22, 2015 3:29 AM

भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी स्वातंत्र्यसेनानी लाला लाजपत राय यांच्या प्रतिमेच्या गळ्यात भाजपाचा भगवा गळपट्टा (स्कार्फ) घालून एक नवा वाद उभा केला आहे.

दिल्लीचे रण तापले : पुतळ््याला घातला भाजपाचा गळपट्टानवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी कृष्णानगरमध्ये स्वातंत्र्यसेनानी लाला लाजपत राय यांच्या प्रतिमेच्या गळ्यात भाजपाचा भगवा गळपट्टा (स्कार्फ) घालून एक नवा वाद उभा केला आहे. त्यांच्या या कृत्याची आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी निंदा केली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी बेदींनी राय यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या प्रतिमेची स्वच्छता केली आणि त्याला भाजपाचा भगव्या रंगाचा गळपट्टा घातला. या गळपट्ट्यावर भाजपाचे कमळाचे चिन्ह अंकित होते. मात्र थोड्यात वेळात त्यांनी तो गळपट्टा प्रतिमेच्या गळ्यातून काढूनही घेतला. गळपट्ट्याच्या या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, केजरीवाल यांनी स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांचे भगवेकरण करू नये, असे म्हटले आहे. कमीत कमी त्यांना तरी सोडून द्या़ ते कोणत्या पक्षाचे नसतात, ते देशाचे असतात. त्यांना भाजपा किंवा काँग्रेस अशा पक्षांत विभाजित केले जाऊ नये. बेदी यांनी रोड शोआधी कृष्णानगर येथील चहा विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते यांच्याशी संवाद साधला; नंतर उमेदवारी अर्ज दाखल केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)बेदी, केजरीवाल संधिसाधू - माकनआम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल व भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी हे दोघे संधिसाधू असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी केला आहे. या दोघांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी अण्णा हजारे यांचा वापर केल्याची टीकाही त्यांनी केली. बेदी या भूतकाळात चांगल्या पोलीस अधिकारी होत्या. मात्र राजकारण व प्रशासनात वेगळ्या क्षमतांची गरज असते, धैर्याची गरज असते. तुम्हाल सगळ्यांचे ऐकून घ्यावे लागते. मात्र त्या चांगल्या श्रोता नाहीत, असेही ते म्हणाले. भाजपात कुठलाही पेचप्रसंग नाही - राजनाथसिंगच्मुख्यमंत्रिपदासाठी किरण बेदी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पक्षात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असतानाच गृहमंत्री राजनाथसिंग यांनी मात्र भाजपात कुठलाच पेचप्रसंग नसून, पक्ष एकजुटीने निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन केले. च्पक्षातील असंतोषाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिंग यांनी भाजपात कुठलीच समस्या नाही. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीकरिता पक्षात एकजूट आहे, असा दावा केला. च्कोणाला काही तक्रार असल्यास त्यांनी नेत्यांसोबत चर्चा करावी; त्याला मुद्दा बनविण्यात काहीच अर्थ नाही. पक्षाचे सर्व कार्यकर्ते दिल्लीतील निवडणुकीत आपले सहकार्य देतील, असे सिंग यांनी म्हटले आहे. अरविंद केजरीवालांचा नवी दिल्लीतून उमेदवारी अर्जआम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी नवी दिल्ली मतदारसंघाकरिता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्यांच्या या अर्जामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतील लढत अधिक चुरशीची झाली आहे. अर्ज दाखल केल्यानंतर केजरीवाल यांनी आमचा लढा कोणा व्यक्तीविरुद्ध वा राजकीय पक्षाविरुद्ध नाही; तो भ्रष्टाचार व महागाईविरुद्ध असल्याचे म्हटले. अण्णांचे कानावर हात दिल्लीत राजकारण पेटलेले असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याबाबत कानावर हात ठेवले आहेत. त्याबद्दल आपल्याला बोलायचे नाही, असे स्पष्ट करीत आपचे अरविंद केजरीवाल असो किंवा भाजपाच्या किरण बेदी दोघांपासून चार हात लांब असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.