कोरोना व्हायरस साथीचा (Covid-19 pandemic) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोना व्हायरसच्या ओमायक्रोनच्या नव्या व्हेरिअंटनं युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कहर केला आहे. यावेळी कोरोना BA.2 किंवा Steelth Omicron च्या रूपात परतला आहे. दक्षिण कोरियामध्ये सर्वात वाईट स्थिती पाहायला मिळत आहे. जिथं दररोज सुमारे पाच लाख नवे रुग्ण आढळून येत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) ओमायक्रॉन बीए.२ सब व्हेरिअंट सर्वात वेगानं प्रसार होणारा व्हेरिअंट असल्याचं म्हटलं आहे. आता तिसरी लाट संपल्यानंतर चीन, दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, ब्रिटन सारख्या देशांमध्ये या नव्या व्हेरिअंटचा उद्रेक होऊ लागला आहे. आता या व्हेरिअंटनं भारतातकी प्रवेश केला असल्याची माहिती समोर आली आहे.
तामिळनाडूच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते मार्च या कालावधीत राज्यातील १८.४ टक्के नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन ba.2 सबव्हेरिअंट आढळून आला आहे. Omicron BA.2 म्हणजे काय, त्याची लक्षणे आणि भारतातील स्थिती जाणून घेणं महत्वाचं आहे. सॅम्पल जीनोमिक सिक्वेन्सिंगमध्ये असंही आढळून आलं की ४३ टक्के नमुन्यांमध्ये सबवेरिएंट ba.1.1 आढळून आला आहे, तर ba.1 सबव्हेरिएंट ३७.३ टक्के नमुन्यांमध्ये आढळलं आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेतील संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग (WGS) मध्ये असं दिसून आलं आहे की राज्यातील ४९६ व्हेरिअंटपैकी 93 टक्के नमुने ओमायक्रॉन व्हेरिअंटचे होते. राज्यातील नमुन्यांपैकी ६.६ टक्के नमुने डेल्टा प्रकारातील असल्याचंही या अभ्यासातून समोर आलं आहे. डेल्टा हा कोरोना विषाणूचा आतापर्यंतचा सर्वात प्राणघातक प्रकार मानला जात होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं कारण डेल्टा व्हेरिअंट ठरला होता.
घाबरण्याचं कारण नाहीसंपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग (WGS) डेटा लोकांमध्ये कोणतीही भीती निर्माण करण्यासाठी जारी करण्यात आलेला नव्हता. तर BA.2 व्हेरिअंटबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी डेटा जारी करण्यात आला आहे. अनेक देशांमध्ये हा व्हेरिअंट झपाट्यानं पसरत असल्यानं लोकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचं तामिळनाडूचे आरोग्य सचिव जे.राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे.
कोरोना विषाणूच्या इतर व्हेरिअंटप्रमाणेच BA.2 व्हेरिअंट देखील श्वसन प्रणालीमध्ये सर्वाधिक प्रभावित करतो. मुख्य फरक असा आहे की त्याची सुरुवातीची लक्षणं फुफ्फुसांशी अजिबात संबंधित नाहीत. या नवीन व्हेरिअंटबाबत केलेल्या अभ्यासानुसार, यात चक्कर येणं आणि थकवा ही दोन विशिष्ट लक्षणं आढळून आहेत. ही लक्षणं विषाणूची लागण झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत जाणवू शकतात आणि ती जास्त काळ टिकू शकतात.
BA.2 व्हेरिअंटचे पचनशक्तीशी निगडीत 6 लक्षणंएका रिपोर्टनुसार, स्टेल्थ ओमिक्रॉन नाकाऐवजी आतड्यांवर अधिक परिणाम करतो, ज्यामुळे पचनसंस्थेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे मळमळ, जुलाब, उलट्या, ओटीपोटात दुखणे, उष्णतेची जळजळ आणि सूज येणे यासारख्या पाचन समस्या उद्भवू शकतात. या प्रकारात वास किंवा चव कमी होणे आणि श्वास लागणे यासारखी लक्षणे दिसण्याची शक्यता कमी असते.
BA.2 व्हेरिअंटची इतर लक्षणं- ताप- खोकला- घशात खवखव- स्नायूंचा थकवा किंवा ताणले जाणं- हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणं