मामल्लापुरम : चेन्नईतील संपर्काच्या माध्यमातून भारत आणि चीन यांच्या संबंधातील सहकार्याचे नवे युग सुरू होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतच्या शिखर बैठकीत एकानंतर एक अशा साडेपाच तास झालेल्या चर्चेत मोदी यांनी हा विश्वास व्यक्त केला. मामल्लापुरमच्या एका लक्झरी रिसॉर्टमध्ये दुसऱ्या दिवशी या दोन नेत्यांत शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाली. दरम्यान, या चर्चेत काश्मीरचा मुद्दा मात्र उपस्थित करण्यात आला नाही.
शी जिनपिंग म्हणाले की, द्विपक्षीय संबंधांवर अतिशय स्पष्ट आणि मनापासून चर्चा झाली. काश्मीरच्या निर्णयानंतर दोन देशांत निर्माण झालेला तणाव कमी करून संबंध दृढ करण्याचे प्रयत्न कृतीतून प्रतिबिंबित होत होते. मागील वर्षी चीनच्या वुहानमध्ये शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या पहिल्या अनौपचारिक शिखर बैठकीच्या परिणामांचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, या चर्चेने आमच्या संबंधांना नवा विश्वास दिला आहे.चेन्नईतील संपर्काच्या माध्यमातून आजपासून सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले आहे. मतभेद विवेकाने सोडविणे आणि त्याचे रूपांतर वादामध्ये होऊ न देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. एकमेकाबाबत संवेदनशील राहण्याचे आम्ही ठरविले आहे.शिष्टमंडळ स्तरावरील बैठकीपूर्वी शी जिनपिंग आणि मोदी यांच्यात फिशरमॅन कोव रिसॉर्टमध्ये समोरासमोर जवळपास एक तास चर्चा झाली. शुक्रवारी या दोन नेत्यांनी रात्रीभोजनात अडीच तास चर्चा केली.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आपला भारत दौरा पूर्ण करून शनिवारी ‘एअर चायना’च्या एका विमानाने नेपाळला रवाना झाले. तामिळनाडूची राजधानी चेन्नईपासून ५० कि.मी. अंतरावरील मामल्लापुरममध्ये या दौºयाची सुरुवात झाली होती.तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री के. पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम आणि विधानसभेचे अध्यक्ष पी. धनपाल यांनी शी जिनपिंग यांना निरोप दिला. (वृत्तसंस्था)मोदींनी हटविला समुद्रकिनाºयावरील कचरापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी फेरफटका मारताना समुद्रकिनाºयाजवळचा प्लास्टिकचा व अन्य कचरा हटविला. मोदी यांनी टष्ट्वीट करीत तीन मिनिटांचा एक व्हिडिओ जारी केला आहे. यात ते कचरा एकत्र करताना दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे.व्यापार, गुंतवणूक विषयांवर यंत्रणा स्थापन करणारव्यापार, गुंतवणूक आणि सेवा क्षेत्राशी संबंधित विषयांवर एक नवी यंत्रणा स्थापन करण्यावर पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सहमती व्यक्त केली. क्षेत्रीय आणि जागतिक मुद्यांवर सहयोग वाढविण्यावरही चर्चा करण्यात आली.परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, क्षेत्रीय आर्थिक भागीदारीवर (आरसीईपी) भारताच्या चिंतांवर विचार करण्यात येईल, असे आश्वासन शी जिनपिंग यांनी दिले. तसेच त्यांनी दोन्ही देशांत अधिक संपर्क आणि संरक्षण क्षेत्रात संपर्क वाढविण्यावर भर दिला.शी जिनपिंग आणि मोदी यांनी सांगितले की, दोन्ही देशांनी भविष्याकडे पाहण्याची गरज आहे. दहशतवादाला तोंड देण्यासाठी सोबत काम करावे लागेल. शी जिनपिंग यांनी सांगितले की, व्यापार तोटा कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यास चीन तयार आहे.चीनकडून उपपंतप्रधान हु छुन आणि भारताकडून अर्थमंत्री निर्मला सीतारामण नेतृत्व करतील. आयटी आणि फार्मा क्षेत्रात भारताकडून चीनमध्ये गुंतवणूक करण्याच्या निर्णयाचे चीनने स्वागत केले आहे. दोन्ही देशांतील राजनयिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल ७० कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.