Bihar News: बिहारच्या बेगुसरायमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिकांच्या मदतीने या तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ही संपूर्ण घटना चकिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिमरिया गंगा घाटात घडली. विशेष म्हणजे, एकाला वाचवण्यात इतर चौघे बुडाले.
मिळालेल्या माहितीनुसार, बरौनी येथील रहिवासी राजू साह यांच्या मुलाच्या जावळाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेकजण सिमरिया येथे गेले होते. कार्यक्रमानंतर 6 तरुण गंगेत अंघोळ करण्यासाठी गेले. यावेळी एक तरुण बुडू लागला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यात पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. तर एका तरुणाला स्थानिकांनी वाचवले.
सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आलेघटनेची माहिती मिळताच चकिया पोलीस ठाण्याने घटनास्थळ गाठून सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी बेगुसराय सदर रुग्णालयात पाठवले. एकाच वेळी पाच तरुणांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.