शासनाच्या अधीन धर्म असल्याने विकास चुकीच्या दिशेने -१
By admin | Published: February 21, 2015 12:50 AM
शासनाच्या अधीन धर्म असल्याने विकास चुकीच्या दिशेनेस्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्याशी लोकमतची चर्चा नागपूर : वर्तमानात कोणत्याही धर्माचे गुरु किंवा धार्मिक संस्था या राज्य सरकारच्या कृपादृष्टीपासून दूर नाहीत. राज्य शासनाच्या अधीन असल्याने धार्मिक संस्थांचा स्वतंत्र व शास्त्रोक्त प्रभाव समाजावर फारसा होताना दिसून येत नाही. राजाश्रय प्राप्त संस्था असल्याने सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध ...
शासनाच्या अधीन धर्म असल्याने विकास चुकीच्या दिशेनेस्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्याशी लोकमतची चर्चा नागपूर : वर्तमानात कोणत्याही धर्माचे गुरु किंवा धार्मिक संस्था या राज्य सरकारच्या कृपादृष्टीपासून दूर नाहीत. राज्य शासनाच्या अधीन असल्याने धार्मिक संस्थांचा स्वतंत्र व शास्त्रोक्त प्रभाव समाजावर फारसा होताना दिसून येत नाही. राजाश्रय प्राप्त संस्था असल्याने सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध त्या काहीही करण्यास असमर्थ ठरतात. याचा परिणाम धोरणांवर पडत आहे. सरकारच्या योजना व धोरण धर्मसंमत नसल्याने त्या निसर्गाच्या विरोधात तयार होत आहेत. त्यामुळे विकासाच्या ऐवजी विनाशाला निमंत्रण दिले जात आहे. संपूर्ण भारताचे हे चित्र असून तोच खरा चिंतेचा विषय आहे, असे मत गोवर्धनमठ पुरीपीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान लोकमतशी विशेष चर्चा करतांना व्यक्त केले. स्वामीजींनी स्पष्ट सांगितले की, भारतात जितकेही धर्म आहेत ते सरकारच्या विरोधात आपले स्वतंत्र मत व्यक्त करू शकत नाहीत. धर्माच्या अधीन शासन असायला हवे, परंतु भारतात शासनाच्या अधीन धर्म असल्याने देशातील चित्रच उलटे झाले आहे. आज कोणत्याही धर्माचा गुरु हा एकतर काँग्रेसशी संबंधित अहे किंवा भाजपाशी संबंधित आहे. राजकीय नेत्यांनी याप्रकारे धर्माला आपल्या ताब्यात ठेवले आहे. त्यामुळे भारताचा विकास स्वत: आपल्या अंतरभावनेतून न होता इतर देशांच्या विकासाच्या प्रभावातून होत आहे. विकासाच्या नावावर दारिद्र्यता आणि गुलामगिरी आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धर्माला राजकारणाच्या अधीन आणण्याचा प्रयत्न आजचा नव्हे तर इंग्रजांच्या काळापासून सुरू आहे. एकेकाळी इंग्रजांनी एका धार्मिक संस्थेच्या माध्यमातून हिंदंूवर धार्मिक रूपात शासन करण्याचा प्रयत्न केला होता. स्वातंत्र्यानंतर दोन मोठ्या सामाजिक व राजकीय नेत्यांना संत म्हणून प्रसिद्ध करण्यात आले. वस्तुत: ते साधू नसून राजकारणी होते. त्यामुळे या देशातील राजकारण्यांनी संतांचे कधी ऐकलेच नाही. उलट आपल्या स्वार्थासाठी साधूसंतांचा वापर केला. जर शासनाने संतांचे मार्गदर्शन मागितले असते तर देशाचा विकास योग्य मार्गाने झाला असता.