पुरातत्वाची अट : मात्र अद्याप लेखी पत्र प्राप्त नाही.त्र्यंबकेश्वर : गेल्या अनेक वर्षांपासून पुरातत्त्व विभाग, नवी दिल्लीकडे रेंगाळत पडलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शनवारीचा पूर्वेकडील आराखड्यास राष्ट्रीय प्राधिकरणाची मान्यता मिळाली आहे. तशा आशयाचा संदेश विश्वस्त कै लास घुले यांना प्राप्त झाला आहे. तथापि, अगोदर मुंबई व तेथून पत्राद्वारे हा संदेश पाठविला जाईल. हा संदेश पोस्टाने येईल, तोपर्यंत वेळ लागणार आहे. १८ मार्चला काही अटींवर पूर्व दरवाजा दर्शनवारी मार्ग अगदी पुरातत्त्व विभागास जसा पाहिजे तसा आराखडा मंजूर झाला आहे. या मार्गात दर्शनवारी स्वच्छतागृह, औषधे तसेच अल्पोपहाराची सुविधा राहणार आहे. याशिवाय चहापान, बगीचा विकसन, भूमिगत पाण्याची टाकी, कंपाउंड वॉल, सध्याच्या असलेल्या स्वच्छतागृहाची दुरुस्ती, तसेच आणखी स्वच्छतागृह आदि बांधकामांचा समावेश असणार आहे. बांधकाम करताना पूर्व दरवाजावारीचे बांधकाम पक्के असणार नाही. गरज पडल्यास हे बांधकाम काढता देखील येऊ शकेल. बांधकाम साहित्याचा नमुना प्राधिकरणाला सादर करावयाचे आहे. दर्शनवारी आराखडा मंदिरालगत असल्याने नियोजित केलेल्या अंतरावर टाकी व स्वच्छतागृह बांधावयाचे आहे. पूर्व दरवाजाजवळ असलेला भराव काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे राष्ट्रीय स्मारकांच्या यादीत असल्याने येथे कोणतेही पक्के बांधकाम करण्यास किंवा खोदकामदेखील करण्यास मनाई आहे. त्यामुळे दर्शनबारीचे काम रखडले होते. पाठविलेला आराखडा पुरातत्त्व विभागाच्या सूचनेप्रमाणे वारंवार बदल करीत येथील विश्वस्त कै लास घुले व सचिंद्र पाचोरकर दिल्लीपर्यंत वारंवार पाठपुरावा केला. तसेच या दोन्ही विश्वस्थांनी उन्हाळ्यात भाविकांना संरक्षण मिळावे, तेही अनवाणी पायांनी उभे रहावे लागते. तसेच पावसाळ्यात तर भाविकांचे हाल, तर हिवाळ्यात जीवघेण्या थंडीत उभे रहावे लागते. याबाबत घुले यांनी पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांना पटवून सांगितले. त्यांच्या मर्जीप्रमाणे आराखड्यात बदल करून अखेर आराखडा मंजूर करण्यात आला. अर्थात त्र्यंबकेश्वर ट्रस्टपर्यंत येण्यास त्याला काही अवधी लागणार आहे. येत्या सिंहस्थापूर्वी काम पूर्ण होईल अशी आशा करण्यास हरकत नसल्याचे या दोन विश्वस्थांनी सांगीतले.
त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्व दरवाजाच्या दर्शनवारीच्या आराखड्यास मान्यता
By admin | Published: March 24, 2015 11:07 PM