पश्चिम बंगालमधील हल्दियाच्या इंडियन ऑईलच्या कॅम्पसला मोठी आग लागली आहे. यामध्ये 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून जवळपास 35 जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आग इंडियन ऑईलच्या ऑईल डेपोला लागल्याचे सांगितले जात आहे. इंडिया टुडेने याचे वृत्त दिले आहे.
हल्दियामध्ये असलेल्या आयओसीएलच्या प्लाँटला ही आग लागली. जखमींना आयओसीएलचे हॉस्पिटल आणि कोलकाता पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. सुत्रांनुसार कंपनीमध्ये आज एका मॉकड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक प्लांट बंद करण्याचे काम सुरु होते. याचलेळी ड्रिलिंगदरम्यान स्फोट झाला आणि आग लागली. घटनास्थळीच आयओसीएलचे बंब असल्याने 10 बंबांद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.