शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
3
'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका
4
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
5
मुलाला अटक होताच आमदारानं केलं सरेंडर; घरात सापडला १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह 
6
Video - सेल्फीचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर उभा असताना आली ट्रेन, 1 सेकंद उशीर झाला असता तर...
7
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
8
“बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर
9
कोण आहेत मुकेश अहलावत? ज्यांना दिल्लीतील आतिशींच्या मंत्रिमंडळात मिळालं स्थान
10
"लॉरेन्स बिश्नोईला पाठवू?" भल्या पहाटे सलीम खान यांना धमकी, बुरखाधारी महिलेने रस्ता अडवून...
11
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"
13
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
14
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
15
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
16
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
17
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
18
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
19
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
20
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता

नबन्ना प्रोटेस्टच्या आयोजकाला बंगाल पोलिसांनी केली अटक, भाजपाच्या ‘बंगाल बंद’ला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 9:15 AM

West Bengal Nabanna Protest Updates: कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयात एका ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेविरोधात नबन्ना प्रोटेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केलं होतं. दरम्यान, या नबन्ना प्रोटेस्टचा आयोजक अससलेला विद्यार्थी नेता सयान लाहिडी याला अटक करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांचं आंदोलन आजही सुरू आहे. 

कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयात एका ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणावरून बंगालमध्ये निर्माण झालेला रोष थांबण्याचं नाव घेत नाही आहे. मंगळवारी कोलकात्यामध्ये नबन्ना प्रोटेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केलं होतं. दरम्यान, या नबन्ना प्रोटेस्टचा आयोजक अससलेला विद्यार्थी नेता सयान लाहिडी याला अटक करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांचं आंदोलन आजही सुरू आहे. 

तसेच आज भाजपाने १२ तासांच्या बंगाल बंदचं आयोजन केलं आहे. भाजपाने बोलावलेल्या बंगाल बंदविरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज बंगालमध्ये कुठलाही बंद राहणार नाही. तसेच सरकारी कर्मचारी कार्यालयात आले नाहीत, तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असे सांगितले.  

भाजपाच्या बंगाल बंदला सुरुवात झाली असताना भाजपा नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आहे. ममता बॅनर्जी सरकारची भूमिका खूपच वाईट आहे. राज्यातील पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केली आहे. त्यांनी रसायनं मिसळून आंदोलकांवर त्याची फवारणी केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार महिलांना संरक्षण देण्यास अपयशी ठरलं आहे. आमचं आंदोलन सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

तर भाजपा नेते सुकांत मजुमदार यांनी नबन्ना प्रोटेस्टमध्ये सहभागी झाल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना मुक्त करण्याची मागणी केली आहे.  या संबंधात त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. मजुमदार यांनी सांगितले की, हा बंद हुकूमशाहीविरोधात आवश्यक आहे. ममता सरकार न्यायासाठी जनता करत असलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपा