"काँग्रेसला आमच्याकडून सहकार्य हवे आहे, पण आता...", ममता बॅनर्जींचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 04:28 PM2023-06-16T16:28:31+5:302023-06-16T16:30:10+5:30
बंगाल पंचायत निवडणुकीत काँग्रेसने सीपीआय(एम) सोबत युती केली आहे.
पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या संघर्षांबाबत विरोधकांच्या आरोपादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. जे आज बंगालमध्ये शांतता नसल्याचे सांगत आहेत, त्यांना मी विचारतो की सीपीआय(एम) च्या राजवटीत काय शांतता होती? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्या दक्षिण 24 परगणामध्ये बोलत होत्या.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, "काँग्रेस अनेक राज्यांत आहे, त्यांना संसदेत आमचे सहकार्य हवे आहे. आम्ही त्यांना भाजपच्या विरोधात पाठिंबा द्यायला तयार आहोत, पण सीपीआय(एम) सोबत हातमिळवणी केल्यानंतर बंगालमध्ये आमचे सहकार्य मागण्यासाठी येऊ नका." दरम्यान, बंगाल पंचायत निवडणुकीत काँग्रेसने सीपीआय(एम) सोबत युती केली आहे.
भाजपवर काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कालपर्यंत पंचायत निवडणुकीसाठी 2 लाख 31 हजार अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी टीएमसीने 82 हजार अर्ज भरले, पण विरोधी पक्षाने दीड लाख अर्ज भरले. टीएमसीने काही केले तर ते वाईट. भाजपचे बहुतेक लोक चोर, डाकू, गुंड आहेत."