काेलकाता : बंगालने भारताला वाचविले, अशी मार्मिक प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या दणदणीत विजयानंतर दिली.
नंदीग्राममध्ये मतमाेजणीदरम्यान काहीतरी गडबड झाल्याचा आराेप ममतांनी केला असून, त्याविराेधात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काेराेनाच्या परिस्थितीमुळे शपथविधी साध्या पद्धतीनेच करणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले. काेराेनाच्या संकटाचा सामना करण्यास प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला. निकाल जाहीर झाल्यानंतर रविवारी सायंकाळी पत्रकारांशी बाेलताना त्यांनी सांगितले, की नंदीग्रामच्या मतमाेजणीत गडबड झाली आहे. निकाल जाहीर केल्यानंतर काही बदल करण्यात आले आहेत. ते मी समाेर आणणार आहे. निकाल मला मान्य आहे. मात्र, या गडबडीविराेधात मी न्यायालयात जाणार आहे.
दीदी ओ दीदी अशी हाक देत मोदी यांनी ममतांना ललकारले होते. बंगालमध्ये केवळ दीदीचीच दादागिरी चालेल, असेच जनतेने दाखवून दिले आहे.
नेते पक्ष सोडून जात असताना कार्यकर्त्यांचे मोहोळ पक्षासोबत बांधून ठेवण्याचे डावपेच
मोदी-शहा यांच्याविरुद्ध थेट संघर्ष उभा करून सामान्यांच्या मनात आकर्षण निर्माण करण्यात यश
आव्हान देणारा भाजप व त्यांच्या बाहेरच्या नेत्यांना बंगाल शरण जाणार नाही, असा जोरदार प्रचार व त्यामधून बंगाली स्वाभिमान, अस्मितेला फुंकर
जखमी पाय घेऊन व्हीलचेअरवर रोड शो, प्रचारसभा यांमधून महिलांमध्ये सहानुभूती निर्माण करण्यात यश
भाजपविरोधात अल्पसंख्याक व सहिष्णू हिंदू मतदारांना साद