शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

बेंगळुरुमध्ये ५ तास वाहतूक कोंडी, शाळेतली मुलं रात्री ९ वाजता घरी पोहचली, नागरिकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 10:38 AM

वाहनांचा आवाज आणि तासनतास होणाऱ्या गोंधळामुळे तेथे अडकलेल्या नागरिकांना त्रासदायक झाले होते.

नवी दिल्ली: देशातील आयटी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमध्ये बुधवारी (२७ सप्टेंबर) संध्याकाळी एवढी मोठी वाहतूक कोंडी झाली होती की संपूर्ण शहर ठप्प झाले होते. एक किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी २ तास लागत होते, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती, याचा अंदाज आपण लावू शकतो. शाळेतल्या मुलांना घरी पोहचायला रात्री ८-९ वाजल्याचे पाहायला मिळाले.

वाहनांचा आवाज आणि तासनतास होणाऱ्या गोंधळामुळे तेथे अडकलेल्या नागरिकांना त्रासदायक झाले होते. वाहतूक पोलिसांनाही घाम फुटला. या कोंडीत अनेकांनी सोशल मीडियावर ऑनलाइन येऊन आपल्या समस्या सांगितल्या. नागरिकांनी प्रशासनावरही संताप व्यक्त केला. बेलंदूरमध्ये एक दृश्य समोर आले आहे, ज्यामध्ये वाहतूक इतकी खराब होती की फूटपाथवर दुचाकी धावत होत्या आणि पादचाऱ्यांसाठी जागाच उरली नव्हती.

बेंगळुरू वाहतूक आयुक्त आयपीएस एमएन अनुचेथ यांनी सांगितले की, ते त्यांच्या टीमसोबत ओआरआर (आउटर रिंग रोड) वर होते. यावेळी वाहतूक नेहमीच्या दुप्पट असल्याचे त्यांनी सांगितले. साधारणत: बुधवारी वाहनांची संख्या दीड ते दोन लाख असते. पण, सायंकाळी साडेसातपर्यंत हा आकडा साडेतीन लाखांवर पोहोचला होता. याचं कारण म्हणजे २८ ऑक्टोबरपासून ५ दिवसांची दीर्घ आठवडा सुट्टी असणार आहे. अशा परिस्थितीत लोक बेंगळुरूमधून सुट्टी घालवण्यासाठी बाहेर पडले होते. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडीही झाली.

दक्षिण आफ्रिकेचा स्टँड अप कॉमेडियनही अडकला

दक्षिण आफ्रिकेचा स्टँड अप कॉमेडियन ट्रेव्हर नोव्हाही आऊटर रिंग रोडवर ट्रॅफिक जॅममध्ये अडकला. त्याचा शो बेंगळुरूमध्ये होणार होता पण तो ३० मिनिटे ट्रॅफिकमध्ये अडकला. पूर्णिमा नावाच्या एका ट्विटर युजरने ट्विट केले की, अॅम्ब्युलन्स २० मिनिटे तिच्यासोबत अडकली होती. १५ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ५ तास लागले. कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या विरोधात शेतकरी संघटनेने कर्नाटकात बंदची घोषणा केली होती. त्यामुळे बुधवारी सुटीही होती.

टॅग्स :BengaluruबेंगळूरTrafficवाहतूक कोंडी