नवी दिल्ली: देशातील सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर झाली आहे. 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बंगळुरू सर्वोत्तम शहर ठरलं आहे. तर 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत सिमला अव्वल आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं आज वास्तव्य करण्यास अनुकूल असलेल्या शहरांची योदी जाहीर केली. या खात्याचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबद्दलचा अहवाल प्रसिद्ध केला. राहण्यास योग्य असलेल्या सर्वोत्तम शहरांच्या सर्वेक्षणात 111 शहरांचा समावेश होता. या शहरांची वर्गवारी दोन गटांत करण्यात आली. 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली शहरं आणि 10 लाखांहून कमी लोकसंख्या असलेली शहरं अशा दोन गटांत शहरांची विभागणी करण्यात आली. वास्तव्य करण्यास आवश्यक असलेलं सुयोग्य वातावरण, विकासकामांचा स्थानिकांच्या आयुष्यावर होणारा परिणाम अशा गोष्टींचा विचार सर्वेक्षणात करण्यात आला.2018 पासून सर्वेक्षणास प्रारंभसर्वप्रथम 2018 मध्ये शहरांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर 2020 मध्ये सर्वेक्षण करण्यात आलं. यासाठी प्रामुख्यानं तीन गोष्टींचा विचार करण्यात आला. गुणवत्ता (35 टक्के), आर्थिक योग्यता (15 टक्के), विकासाची स्थिरता (20 टक्के) या तीन गोष्टींचा विचार मुख्यत्वे केला जातो. तर इतर 30 टक्क्यांसाठी लोकांना प्रश्न विचारून सर्वेक्षण केलं जातं.
10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली सर्वोत्तम शहरं-1. बेंगलुरू- 66.702. पुणे- 66.273. अहमदाबाद- 64.874. चेन्नई- 62.615. सूरत- 61.736. नवी मुंबई- 61.607. कोयम्बटूर- 59.728. वडोदरा-59.249. इंदौर- 58.5810. ग्रेटर मुंबई- 58.23
10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली सर्वोत्तम शहरं-1. शिमला- 60.902. भुवनेश्वर- 59.853. सिल्वासा -58.434. काकिनाडा- 56.845. सेलम- 56.406. वेल्लोर- 56.387. गांधीनगर- 56.258. गुरूग्राम -56.009. दावनगेरे -55.2510. तिरुचिरापल्ली- 55.24