"मी काय केलं होतं?, माझ्या घरावर का हल्ला केला?, माझं घर का पेटवलंत?"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 09:51 AM2020-08-14T09:51:16+5:302020-08-14T09:52:39+5:30
कर्नाटकची राजधानी बंगळुरूत सोशल मीडियावरील एका पोस्टवरून काही दिवसांपूर्वी हिंसाचार झाला आहे. काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या घरावर जमावाने हल्ला केला.
बंगळुरू - सोशल मीडियावरील एका पोस्टवरून कर्नाटकची राजधानी बंगळुरूत काही दिवसांपूर्वी हिंसाचार झाला आहे. काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या घरावर जमावाने हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवरदेखील जमावाने हल्ला केला. यामध्ये 60 पोलीस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल 110 हून अधिक जणांना अटक केली आहे. यानंतर आता श्रीनिवास मूर्ती यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
जमवाने घरावर हल्ला करून घर पेटवून दिल्यामुळे प्रचंड दुख: झाल्याचं आमदारांनी म्हटलं आहे. घराचं प्रचंड नुकसान झालं असून माझं घर का पेटवलंत? असा सवाल त्यांनी केला आहे. "माझ्या घरावर का हल्ला केला? मी काय केलं होतं? जर मी काही चूक केली असेल तर तुम्ही पोलीस किंवा प्रसारमाध्यमांकडे जाऊ शकता. मी काहीच केलं नसताना करण्यात आलेला हा हल्ला दुर्दैवी आहे" अशा शब्दांत श्रीनिवास मूर्ती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत यांनाही धोकाhttps://t.co/0MBlRi5ZYv#SakshiMaharaj#BJP#Pakistan
— Lokmat (@MiLOKMAT) August 12, 2020
मूर्तींच्या भाच्याच्या सोशल मीडियावरील पोस्टने बंगळुरूत वादंग माजला आहे. नवीन असं वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याला देखील अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. श्रीनिवास मूर्ती यांनी हिंसाचाराचा निषेध केला आहे. "माझ्या बहिणीचा मुलगा... भाचा, कोणीही असो. चूक झाली असेल तर पोलीस त्याची शिक्षा देतील. माझ्या घराला शिक्षा कशासाठी? मी काय चूक केली होती ? हे खूप वाईट आहे. माझ्या घराची पुढची बाजू पूर्णपणे जळाली आहे. काहीच राहिलेलं नाही, सगळं जळून खाक झालं आहे" असं एका हिंदी वेबसाईटला प्रतिक्रिया देताना श्रीनिवास मूर्ती यांनी सांगितलं आहे.
रुग्णालयात जात असताना रुग्णवाहिका पडली बंद; असा वाचवला रुग्णाचा जीव, व्हिडीओ जोरदार व्हायरलhttps://t.co/j3llO3gHDv#heavyrain#Gujarat#ambulance
— Lokmat (@MiLOKMAT) August 14, 2020
हल्ला झाला तेव्हा आपलं कुटुंब घरात नव्हतं अशी माहिती श्रीनिवास मूर्ती यांनी दिली आहे. "माझं कुटुंब सुरक्षित आहे. पाच मिनिटं आधीच कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी मंदिरात गेले होते. याचवेळी जमावाने घरावर हल्ला केला" असं श्रीनिवास मूर्ती यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूमध्ये जमावाने मूर्तींच्या घरावर दगडफेक केली. यावेळी परिसरात आग लावण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस मूर्तींच्या घराजवळ पोहोचले. त्यामुळे जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. याशिवाय जाळपोळदेखील केली. जमाव प्रक्षुब्ध झाल्यानं पोलिसांनी गोळीबार केला. त्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! कोरोनामुळे तब्बल 7 लाख लोकांना गमवावा लागला जीवhttps://t.co/yRQuoEpAnY#coronavirus#CoronaUpdates#COVID19
— Lokmat (@MiLOKMAT) August 13, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Video - कडक सॅल्यूट! पीपीई किट काढताना अशी होते कोरोना योद्ध्यांची अवस्था, वाहतात घामाच्या धारा
CoronaVirus News : काय सांगता? कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी संशोधक पोहोचले वटवाघुळाच्या गुहेत
15 ऑगस्ट! पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडून मागितली 'ही' गोष्ट, म्हणाले...
'"पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?', आशिष शेलारांचा हल्लाबोल
"आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं"
Video - "स्वदेशीचा अर्थ विदेशी वस्तूंवर सरसकट बहिष्कार टाकणं नाही"