बेंगळुरू : बेंगळुरूची पहिली महिला कॅबचालक म्हणून वृत्तपत्रांमध्ये बातम्यांमध्ये झळकलेल्या भारती वीरथ हिचा मृतदेह सोमवारी रात्री घरी लटकलेला आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे गूढ कायम आहे.भारती सकारात्मक व्यक्तिमत्त्वाची होती. ती अन्य महिला चालकांसाठी आणि प्रवाशांसाठी प्रेरणादायी ठरली होती, असे उबेरने निवेदनात नमूद केले आहे. दोन वर्षांपूर्वी ती उबर या कॅब कंपनीत रुजू झाली होती. तत्पूर्वी ती एजंल सिटी कॅब सर्व्हिसमध्ये होती. तिने पुन्हा आंध्र प्रदेशात परतण्याचे ठरवले होते. सोमवारी रात्री भारतीचा मृतदेह कपड्याने गळफास लावलेल्या अवस्थेत छताला लटकलेला आढळून आला. ती तिसऱ्या माळ्यावरील खोलीत राहात होती. ती रविवारी रात्रीपासून न दिसल्यामुळे घरमालकाने तिच्या खोलीच्या खिडकीतून डोकावून पाहिले होते. (वृत्तसंस्था)
बेंगळुरूच्या महिला कॅबचालकाचा गूढ मृत्यू!
By admin | Published: June 29, 2016 6:07 AM