बंगळुरू - स्वत:च्या भावाला वाचवण्यासाठी एक बहिण काय करू शकते? बंगळुरू येथे राहणाऱ्या गुरदीपनं तिचा आदर्श जगासमोर ठेवला आहे. गुरदीपनं भावाला वाचवण्यासाठी त्यांच्या लिव्हरचा ६८ टक्के भाग दान केला आहे. गुरदीपनं भावाला नवं आयुष्य देण्यासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावली. सोशल मीडियावर या बहिणीनं भावासाठी केलेल्या कृत्याचं कौतुक केले जात आहे. गुरदीपमुळे भावाला जीवदान मिळालं आहे.
यकृताचा हा भाग दान केल्यानंतर दोन आठवड्यांनंतर गुरदीप कौर म्हणाल्या की, 'तुमचे अवयव दान करणे पूर्णपणे योग्य आहे. यकृत प्रत्यारोपणाशिवाय आपल्या भावाचा जीव वाचू शकत नाही हे मला कळालं होते. त्यानंतर बहिणीने पूर्ण शुद्धीत आणि हिंमतीने निर्णय घेत भावाला नवजीवन दिले आहे. दोन मुले आणि पती असूनही नातेसंबंध जपणाऱ्या गुरदीपची ही कहाणी समाजासाठी महत्त्वाची प्रेरणा आहे.
दुबईत भावाची प्रकृती खालावली होतीमे २०२१ मध्ये, दुबईतील तिचा ४४ वर्षीय भाऊ जसवंत सिंग याला सौम्य ताप आला आणि त्यांचे डोळे पिवळे पडले. कावीळ झाली असावी असा विचार करून ते डॉक्टरांकडे गेले, पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यावेळी कोविड-१९ ची दुसरी लाट शिगेला पोहोचली होती त्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आले होते. जसवंतच्या कुटुंबीयांनी १९ मे रोजी त्यांना पंजाबमध्ये घरी आणले. पण त्यांची प्रकृती सतत खालावत गेली. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, यकृत प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. जेणेकरून त्याचा जीव वाचू शकेल.
भावाची अवस्था पाहून बहिणीचा पुढाकारबंगळुरूमध्ये जेव्हा गुरदीपला मोठ्या भावाच्या प्रकृतीबाबत त्यामुळे ती अस्वस्थ झाली. ती स्वत:ला थांबवू शकली नाही आणि भावाला पाहण्यासाठी निघून आली. तिला माहित होते की, ती तिच्या भावाला यकृत दान करण्यासाठी योग्य आहे. कारण आई म्हातारी आहे आणि जसवंतची मुलांची यकृत जुळत नाही. हे तिला माहीत होतं. ४३ वर्षीय गुरदीप म्हणाल्या, 'मला दोन मुलगे आहेत. एक १६ आणि दुसरा ६ वर्षाचा... त्यात ती विंवचनेत पडली असतानाही यकृत दान करण्याचा विचार करत होती. त्याचबरोबर दानकर्त्याला कोणताही धोका नसून यकृत पुन्हा ठीक होईल, अशी ग्वाही डॉक्टरांनी दिली. त्यामुळे भावाचा जीव वाचवण्याचा गुरदीपचा संकल्प अधिक दृढ झाला. 'माझे पती जे सुभेदार मेजर आहेत. ते सुरुवातीला द्विधा मनस्थितीत होते. शेवटी नंतर समजले की मला माझ्या भावाला मदत करायची आहे तेव्हा ते तयार झाले असंही गुरदीपनं सांगितले.