हनुमान बेनीवालांनी वाढविली भाजपची चिंता, यावेळी काँग्रेसच्या समर्थनासह मैदानात
By विलास शिवणीकर | Published: April 17, 2024 06:31 AM2024-04-17T06:31:45+5:302024-04-17T06:32:06+5:30
गत लोकसभा निवडणुकीत भाजपने राजस्थानातील सर्व २५ जागा जिंकल्या होत्या.
विलास शिवणीकर, लोकमत न्यूज नेटवर्क
नागौर : गत लोकसभा निवडणुकीत भाजपने राजस्थानातील सर्व २५ जागा जिंकल्या होत्या. नागौर मतदारसंघातून रालोपा-भाजप युतीचे हनुमान बेनीवाल विजयी झाले होते. नंतर कृषी कायद्याच्या मुद्यावरुन रालोपा आणि भाजप युती तुटली. यंदा रालोपाचे बेनीवाल हे काँग्रेसच्या समर्थनासह ही निवडणूक लढवित आहेत.
माजी केंद्रीय मंत्री नाथूराम मिर्धा यांच्या नात व माजी खासदार ज्योति मिर्धा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. २०१९ च्या निवडणुकीत ज्योति मिर्धा यांनी काँग्रेसच्या तिकिटावर या मतदारसंघातून निवडणूक लढली. पण, यंदाही बेनीवाल यांचेच आव्हान आहे. बसपाने येथून गजेंद्र सिंह राठौर यांना उमेदवारी दिली आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- नागौर या लोकसभा मतदारसंघात एकूण ९ विधानसभा मतदारसंघ येतात. पाणी, रस्ते या येथील समस्या आहेत. शिक्षणाच्या सोयींचा अभाव, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा हे येथील कळीचे मुद्दे आहेत.
- गत चार दशकांपासून येथील लढत ही दोन जाट उमेदवारात होते. भाजपच्या उमेदवार ज्योति मिर्धा या यापूर्वी याच मतदारसंघात २००९ मध्ये काँग्रेसच्या खासदार होत्या. मतदारसंघात त्यांचा चांगला संपर्क आहे. याचा फायदा त्यांना होऊ शकतो.
२०१९ मध्ये काय घडले?
हनुमान बेनीवाल रालोआ (एनडीए) (विजयी) ६,६०,०५१
डॉ. ज्योति मिर्धा काँग्रेस (पराभूत) ४,७८,७९१