नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यातील तणाव अद्यापही पूर्णपणे संपुष्टात आला नाही. चिनी कुरापतींना उत्तर देण्यासाठी भारतीय जवान सज्ज आहेत. दुसरीकडे अरबी समुद्रात ड्रीलच्या माध्यमातून चीनला योग्य संदेश देण्याचं काम भारताने केले आहे. भारतीय नौदलाने अंदमान आणि निकोबार बेटांवर कवायती करुन भारत दडपशाहीला बळी पडणार नाही असा इशाराच चीनला दिला आहे.
अंदमान आणि निकोबार बेटांवर भारताचा युद्ध सराव करण्याला विशेष महत्त्व आहे. कारण याठिकाणाहून चिनी समुद्री मार्गाने जात असतात. अनेक व्यापारी कार्यवाही येथे केली जाते. चीनसाठी हा सराव दुहेरी हल्ल्यासारखा असू शकतो. कारण यापूर्वी अमेरिकेने दक्षिण चिनी समुद्रात दोन एअरक्राफ्ट लढाऊ विमानांसह सराव करत आहेत. चीनला त्यांना धमकी देण्याशिवाय काहीच करता येत नाही.
या बेटांवर भारतीय नौदल युद्धसराव करत आहे. यात विनाशक, पेट्रोल विमान आणि पाणबुड्यांचा समावेश आहे. या सरावाचं नेतृत्व करणारे पूर्वेकडील नौदल कमांडचे प्रमुख रियर एडमिरल संजय वत्सयन म्हणाले की, मल्लकाजवळ असणारी काही युद्धनौकाही यात सामील झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सबमरीन शोधणाऱ्या एअरक्राफ्ट Poseidon 81,ज्यात घातक ब्लॉक मिसाइल लावण्यात आलं आहे. MK 54 लाइटवेज टोरपीडोज यांचाही युद्धसरावत समावेश आहे. यापूर्वी मल्लकामध्ये भारत आणि जपानने मागील महिन्यात सराव केला होता.
गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमधील तणावपूर्ण परिस्थितीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी लेह येथे पोहोचले. त्यांच्यासमवेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे होते. पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर संरक्षणमंत्र्यांचा लेह दौरा आता खूप महत्वाचा मानला जात आहे. पूर्व लडाखमध्ये ५ मेपासून भारतीय आणि चिनी सैन्याच्या दरम्यान संघर्ष सुरू आहे. गलवान खोऱ्यात दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले त्यानंतर हा तणाव वाढला. दरम्यान, कित्येक बैठकानंतर मुत्सद्दी व सैनिकी चर्चेनंतर दोन्ही बाजूंच्या सैन्य ६ जुलैपासून तणावग्रस्त परिसरातून मागे हटण्यास सुरुवात झाली आहे.