नवी दिल्ली - केंद्र सरकारने बहुतांश व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य ठरवले आहे. त्यामुळे आधारकार्ड हे आवश्यक बनलेले आहे. सिमकार्डला आधार जोडणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र तुमचे आधार कार्ड वापरुन बोगस सिमकार्डची खरेदी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जम्मू काश्मीर पासून ते गोवा पर्यंत भारतातील 22 राज्यामध्ये फसवणूक करणारी टोळी कार्यरत आहे.
दैनिक जागरणच्या वृत्तानुासर, बोगस सिमकार्ड घेणाऱ्या टोळीनं व्हॉट्सववर 250 ग्रुप बनवले आहेत. याग्रुपमध्ये पाच हजार ठगांचा समावेश आहे. यामध्ये सिमकार्ड विक्रेता, दुकनदारासह व्यापाऱ्यांचा समावेश आहे. हा खुलासा बायोटेकच्या एका विद्यर्थानं केला आहे. त्याला काल उत्तरप्रदेशच्या सायबरसेलने फ्रॉडच्या केसमध्ये अटक केली होती.
सायबरसेलचे एसपी जितेंद्र सिंग यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, काल सोहल सेल यांला ऑनलाइन फसवणूकीत अटक केली होती. त्याची विचारपूस केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीची आधारावर काल बोगस सिमकार्डची खरेदी करणाऱ्या टोळीतील सदस्य विकास सिंह परिहार आणि प्रिंस कुमार सिंह यांना इंदौर येथून अटक करण्यात आली. विचारपूस केल्यानंतर त्यांचा भांडाफोड झाला. यावेळी त्यांनी भारतातील 22 राज्यांमध्ये व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून पाच हजार जण अशी फसवणूक करत असल्याचे सांगितले.
अशावेळी काय कराल - ज्यावेळी तूम्ही सिमकार्ड खरेदी करायला जाल किंवा इतर कारणासाठी आधारचा वापर करत असाल तर बायोमेट्रिक फिंगर ब्राउजर ध्यान द्या. दुकानदार दूसरे ब्राऊजर ओपन करुन तूमचे बायोमेट्रिक स्कॅन करु शकतो. त्यामुळं आधारचा वापर काळजीपूर्वक करा.