जिनिव्हा/नवी दिल्ली : भारतासह जगभरात कर्करोग (कॅन्सर) होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. २०२२ मध्ये भारतात १४.१ लाखांपेक्षा अधिक कॅन्सरग्रस्त आढळले असून, ९.१ लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात स्तनाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण सामान्य झाले आहे. २०५० पर्यंत कॅन्सर रुग्णांमध्ये ३.५ कोटींपर्यंत वाढ होण्याची भीती आहे. २०२२ मध्ये २ कोटी कॅन्सरग्रस्त आढळले असून, यात तब्बल ७७ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
■ ओठाचा कॅन्सर, जबड्याचा कॅन्सर आणि फुफ्फुसाचा कर्करोग पुरुषांमध्ये सर्वात सामान्य आहे तर, स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर स्त्रियांमध्ये सर्वाधिक आहे.■ स्तन कॅन्सरमध्ये २७ टक्के तर गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण १८ टक्क्यांनी वाढले आहे.■ कॅन्सरचे निदान झाल्यानंतर ५ वर्षाच्या आत जिवंत असलेल्या लोकांची संख्या भारतात जवळपास ३२.६ लाख होती.स्तन कॅन्सर वाढतोय- १०.६% कर्करोग होण्याचा धोका भारतात वाढला आहे.-७.२% कर्करोगामुळे मृत्यू होण्याचा धोका भारतात वाढला आहे.- २०% कर्करोग होण्याचे प्रमाण जगभरात वाढले आहे.- ९.६% कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण जगभरात वाढले आहे.
योग्य उपचार मिळेनात, लवकर निदान होईना१८५ देशांचा अभ्यास यात करण्यात आला. यातील केवळ ३९ टक्के लोकांना कॅन्सरवर उपचार करताना योग्य पॅकेज मिळाले. तर २८ टक्के लोकांची अतिरिक्त्त कव्हर, वेदना कमी करण्यासाठी योग्य काळजी घेण्यात आली. लवकर निदान होत नसल्याने कॅन्सर रुग्णात वाढ होतेय.
तंबाखू घेतोय जीव आशियामध्ये तंबाखू फुफ्फुसाचा कर्करोग वाढण्याचे प्रमुख कारण आहे. स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्यपणे आढळणारा कॅन्सर आहे. जगात ७ टक्के मृत्यू हे स्तन कॅन्सरने होत आहेत. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा जागतिक स्तरावर आठव्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे.
गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर...गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग सार्वजनिक आरोग्य समस्या निर्माण झाली असून, जगभरात यासाठी मोहीम सुरू झाली आहे. या अंतर्गत ९० टक्के मुलींना १५ वर्षे होण्याआधी ह्युमन पॅपिलोमा विषाणू (एचपीव्ही) लस टोचण्यात येत आहे.जगात किती वाढला कॅन्सर? जागतिक स्तरावर ९७ लाख कॅन्सरग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. ५ पैकी एका पुरुषाला कॅन्सर होत असून ९ पैकी १ पुरुष आणि १२ पैकी १ महिलेचा कॅन्सरमुळे मृत्यू होत आहे.