सध्या देशात लग्नाचा सीझन सुरू आहे. याच दरम्यान बिहारच्या भागलपूरमध्ये पार पडलेल्या अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. या अनोख्या लग्नात नवरदेवाने नवरीला हार घातला पण त्यानंतर काही भलतच घडलं. नवरी दुसऱ्यासोबतच पळून गेली. मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर संहौला पोलीस स्टेशन हद्दीतील तरद खिरीदार गावात प्राणपूर, भागलपूर नाथनगर येथील प्राणपूरचे रहिवासी प्रकाश कुमार याचं लग्न ठरलं होतं.
नवरदेव बँडबाजा आणि पाहुणेमंडळीसह वरात घेऊन खिरीडांर गावात पोहोचला. लग्नाच्या रात्री वधू-वरांनी आपापल्या कुटुंबासह लग्नाचे विधी पार पाडण्यास सुरुवात केली. नवरा-नवरीने एकमेकांना हार घालून मिठाई खाऊ घातली. हार घातल्यानंतर पुढचे विधी करण्याची वेळ आली. मात्र त्याचवेळी वधू बाथरूममध्ये जायचं आहे असं सांगून एका खोलीत केली.
कुटुंबीय, पंडितजी आणि नवरदेव नवरीची खूप वेळ वाट पाहत होती. पण बराच वेळ झाला तरी ती खोलीतून बाहेर आली नाही. तर दुसरीकडे वधू आपल्या प्रियकरासह मागच्या दाराने खोलीतून पळून गेली. घटनेची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबात खळबळ उडाली. पाहूणे मंडळी नाराज होऊन आपापल्या घरी निघून गेले पण नवरदेव लग्न करण्यावर ठाम होता.
नवरदेव नवरीच्या घराबाहेर धरणं आंदोलन करण्यासाठी बसला. नातेवाईकांनी गावातील एका मुलीला लग्नासाठी तयार केलं परंतु नवरदेवाने त्या गावात लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर एका दिवसानी कहालगावच्या श्यामपूर येथील तरुणीसोबत लग्न ठरलं. विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.