Punjab Election Results 2022: पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं पहिल्यांदाच सरकार बनणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 'आप'कडून भगवंत मान यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी याआधीच घोषणा झालेली आहे. भगवंत मान यांनी या ऐतिहासिक विजयानंतर सर्वांचे आभार मानले. तसंच जे सोबत येऊ शकले नाहीत त्यांचेही आभार व्यक्त करतो. विरोधकांनी केलेल्या वैयक्तिक टीका आणि टिप्पणीबाबत आज मी सांगू इच्छितो की त्यांनी केलेल्या शब्दावलीसाठी त्यांनाही खूप खूप शुभेच्छा, असं भगवंत मान म्हणाले. आम आदमी पक्षानं पंजाबमध्ये ११७ पैकी ८५ हून अधिक जागांवर आघाडी प्राप्त केली आहे.
पंजाबमधील ऐतिहासिक विजयानंतर भगवंत मान यांनी आम्ही जनतेचे सेवक असून जनतेची सेवा करण्यासाठी आम्हाला निवडून देण्यात आल्याचं म्हणाले. याआधी पंजाबचा कारभार मोठ्या मोठ्या शहरातून चालत होता. पण आता गाव आणि शेतातून कारभाल चालेल, असंही ते म्हणाले. राज्यातील बेरोजगारी सर्वातआधी दूर करण्याचं लक्ष्य असल्याचंही मान यांनी सांगितलं आहे.
भगतसिंग यांच्या गावात घेणार शपथशहीद भगतसिंग यांची जन्मभूमी असलेल्या खटकरकला गावात भगवंत मान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंजाबमध्ये अभूतपूर्व विजयानंतर आप पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही भगवंत मान यांना शुभेच्छा दिल्या. केजरीवाल यांनी मान यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं.
सरकारी कार्यालयात आता मुख्यमंत्र्यांचा फोटो नसणारमुख्यमंत्री झाल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी शहीद भगत सिंग आणि डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे फोटो लावले जातील. भगत सिंग यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तर बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे राज्यातील प्रत्येक कार्यालयात मुख्यमंत्र्याऐवजी शहीद भगत सिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावले जातील, असं भगवंत मान यांनी निवडणुकीआधी म्हटलं होतं. त्यानुसार याबाबतचा निर्णय भगवंत मान घेणार का हे पाहावं लागणार आहे.