शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
4
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
5
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
9
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
10
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
11
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
12
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
13
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
14
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
15
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
16
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
17
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
18
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
19
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
20
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!

पंजाब : मोफत वीज देण्याच्या आश्वासनाचं काय झालं?, विरोधकांनी घेरलं; सत्ताधारी म्हणाले, "अजून तर.."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 7:14 PM

पंजाबमध्ये सत्तेत आल्यास ३०० युनिट मोफत वीज पुरवण्याची घोषणा आपनं निवडणुकीपूर्वी केली होती.

Punjab News : पंजाबमध्ये सत्तेत आल्यास ३०० युनिट मोफत वीज पुरवण्याची घोषणा आपनं निवडणुकीपूर्वी केली होती. आता पंजाबमध्येभगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखाली आपचं सरकार सत्तेत आलं आहे. दरम्यान, आता मोफत वीज देण्याच्या आश्वासनावरुन विरोधकांनी मान सरकारला घेरण्यास सुरूवात केली आहे. 

काँग्रेस पक्षानेही भगवंत मान यांच्या सरकारवर वीजेचे दर वाढवल्याचा आरोप केला आहे. जेव्हा चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे मुख्यमंत्री होते, तेव्हा राज्यातील वीजेचे दर प्रति 100 युनिटसाठी 1.19 रुपये, 101 ते 300 युनिटसाठी 4.01 रुपये आणि 301 युनिट्सच्या वर 5.76 रुपये प्रति युनिट होते, असा दावा काँग्रेसनं केला आहे. परंतु आता भगवंत मान यांच्या सरकारच्या काळात  हे दर पहिल्या 100 युनिटसाठी 3.49 रुपये प्रति, 101 ते 300 पर्यंत 5.84 रुपये आणि 301 पेक्षा अधिक युनिट्ससाठी7.30 रुपये प्रति युनिट वीजेची इतके झाल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.

याप्रकरणी भाजपनंदेखील भगवंत मान यांच्या सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अरविंद केजरीवाल ज्या राज्यात भेट देतात तेथे ते खोटी आश्वासने देतात, असा आरोप भाजपने केला आहे. आम आदमी पक्षाचे सरकार आपले एकही आश्वासन पूर्ण करत नाही. केजरीवाल यांनी पंजाबमध्ये वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यांनी ते पूर्ण केले नाही, असे विधान भाजपने केले आहे.

काय म्हणालं आप?मात्र, वीज मोफत देण्याच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाचे सरकार बचावाच्या भूमिकेत दिसत आहे. चमकौर साहिबमधून माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा पराभव करणारे चरणजीत सिंग यांनी आपलं सरकार एप्रिलमध्येच 300 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे वचन पूर्ण करणार असल्याचं सांगितलं.

"आमचे सरकार प्रत्येक आश्वासन पूर्ण करत आहे. वीज मोफत देण्याचे आश्वासन या महिन्यापासून अंमलात येणार असून प्रत्येक घरात दर महिन्याला 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे. मोफत वीज पुरवण्यासाठी आर्थिक बाबी ठरवण्यात येणार आहेत," असंही चरणजित सिंग म्हणाले.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानArvind Kejriwalअरविंद केजरीवालPunjabपंजाब