लखनौ : उत्तर प्रदेशच्या दक्षिणपश्चिम भागात आणि मध्य भागात व प्रामुख्याने लखनौमध्ये मंगळवारी दुपारी चारच्या सुमारासच अंधार दाटून आल्याने नागरिक आश्चर्यचकित झाले. तत्पूर्वी या भागात जोरदार पाऊसही झाला. अचानक अंधार दाटून आल्याने वाहतूकही विस्कळीत झाली. यामुळे शहरवासीय हैराण झाले होते.दुपारी चारच्या सुमारास लखनौ शहरात अर्धा तास पाऊस झाला आणि काही वेळातच अंधार दाटून आला. मंगळवारी झालेल्या या हवामानबदलामुळे सर्वसामान्य नागरिक चकितही झाले आणि अनेकांची धावपळही उडाली. प्रमुख बाजारपेठांवर याचा परिणाम झाला. खबरदारीसाठी शहरातील वीजपुरवठा केला खंडितपाऊस पडल्यानंतर लखनौमध्ये जोरदार वारेही वाहत होते. अनेक भागात पाणी साचले होते. अंधार दाटून आल्याने आणि पावसाने शहरातील रेल्वे व इतर वाहतूक सेवा प्रभावित झाली. त्यानंतर शहराच्या प्रमुख भागातील वीज पुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव खंडित करण्यात आला होता.कानपूर, संभल, इतवाह या भागातही वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. बुंदेलखंड भागातही पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.हा तर हवामान बदलाचा परिणामराज्याच्या हवामान विभागाचे संचालक जे.पी. गुप्ता यांनी सांगितले की, तापमानवाढीमुळे काही भागात वातावरणातील हा बदल दिसून आला. दरम्यान, लखनौमध्ये सकाळी ऊन होते; पण दुपारनंतर वातावरणात बदल झाला. आभाळ भरून आले. प्रचंड धुळीसह वादळी वारे सुरू झाले. त्यानंतर पाऊस झाला आणि नंतर अंधार दाटून आला.
भरदिवसा लखनौ अंधारले
By admin | Published: December 02, 2015 4:21 AM