पाटणा - अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने आज 'भारत बंद 'ची हाक दिली आहे. देशभरातील शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. देशातील विविध ठिकाणी आंदोलन सुरू असून शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकरी संघटना, राजकीय पक्ष बंदमध्ये सहभागी झाले आहेत. बिहारमध्ये याच दरम्यान एक तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. भाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले असून हाणामारी झाली आहे. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीआधीच पाटणा येथे भाजपा आणि पप्पू यादव यांच्या जन अधिकार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. कृषी विधेयकेवरून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी विधेयकांना तीव्र विरोध केला. मिळालेल्या माहितीनुसार, कृषी विधेयकांना विरोधक तीव्र विरोध करत होते. यावेळी जन अधिकार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच निषेध सुरू केला.
जपच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयाच्या गेटवर चढून निदर्शने करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कार्यालयात उपस्थित असलेल्या भाजपाचे कार्यकर्ते संतप्त झाले. भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. वाहनांची तोडफोड करण्यात आली, लाऊडस्पीकर तोडण्यात आले. तसेच पोस्टर्सही फाडण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हाणामारीनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बिहारमध्ये दिवाळीपूर्वीच 'फटाके वाजणार'; विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर
बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी विधानसभेच्या 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तारखांची घोषणा केली. त्यानुसार, बिहारमधील विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात होणार असून 28 ऑक्टोबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. तर, निवडणुकांचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. म्हणजेच दिवाळीपूर्वीच बिहारमध्ये फटाके वाजणार आहेत.
बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा असून जदयू, भाजपामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविताना रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. "कोरोनाचे संकट असल्याने जगातील 70 देशांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. बिहारमधील ही निवडणूक कोरोना काळातील सर्वात मोठी निवडणूक आहे. कोरोना काळातील ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगानं यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या दृष्टीनं मतदान केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे" अशी माहिती सुनील अरोरा यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
Bharat Bandh : "ना मोबदला, ना सन्मान; नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार"
Bharat Bandh Live Updates : शेतकऱ्यांना ना मोबदला, ना सन्मान; आपल्याच शेतात कामगार - प्रियंका गांधी
गलवानमध्ये 'इतके' सैनिक झाले ठार; चीनने पहिल्यांदाच दिली कबुली
"सरकारने अन्नदाता शेतकऱ्यांना कळसुत्री बाहुली केलं", तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल
"आम्ही आधी हात जोडत होतो, पण आता आपण दिल्ली हादरवू", हरसिमरत कौर यांचा इशारा