08 Dec, 20 02:53 PM
राज्यात एसटी बसच्या ३७१७ फेऱ्या रद्द
मुंबई - भारत बंदमुळे सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यात एसटी बसच्या ३७१७ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
08 Dec, 20 02:21 PM
लोकांची दिशाभूल करणं हे विरोधकाचं जुनंच काम - केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक़वी
08 Dec, 20 01:51 PM
वंचित आघाडीने केला ठाणे बंदचा प्रयत्न
ठाणे - भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने ठाण्यात जोरदार आंदोलन करून ठाणे बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारत बंदला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे ठाणे शहरात राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्टेशन येथे आंदोलन केले.
08 Dec, 20 01:11 PM
भारत बंदला मालेगावमध्ये संमिश्र प्रतिसाद
मालेगाव (नाशिक) :- कृषी कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदला मालेगावमध्ये संमिश्र प्रतिसाद .बाजार समितीच्या मुख्य मुख्य आवारातील लिलाव तसेच मुंगसे व झोडगे उपबाजारात लिलावात भाग बाजारातील लिलाव बंद ठेवण्यात आली होती शहरातील काही दुकाने बंद होती दाभाडी येथे शेतकऱ्यांनी निवेदन सादर करून केंद्र शासनाचा निषेध केला.
08 Dec, 20 01:06 PM
आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
ठाणे येथील रेस्ट हाउस च्या बाहेर आज राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ केंद्र सरकार च्या विरोधात आंदोलन केले या वेळी आंदोलन कर्त्यांना अटक करण्यात आली
08 Dec, 20 12:58 PM
साताऱ्यात आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड
कामकाज ठप्प : बाजार समित्यांच्या आवारामध्ये शांतता; जिल्ह्यात भारत बंदला शंभर टक्के प्रतिसाद
सातारा : केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी कायदे त्वरित रद्द करावेत शेतमालाला हमीभाव जाहीर करावा, या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सातारा जिल्ह्यात ठिकाणी मंगळवारी बंद पाळण्यात आला. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने सातारा शहरातून रॅली काढणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
08 Dec, 20 12:57 PM
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट
नाशिक- कृषी विधेयकाच्या विरोधात नाशिक शहरातील नाशिकरोड येथील बिटको उड्डाण पुलाखालील भाजी बाजार विक्रेत्यांनी देखील बंद पाळला असून तसा फलक लावला आहे.
08 Dec, 20 11:52 AM
आंदोलनावर भाजपाची टीका, काँग्रसने निवडणूक जाहीरनाम्यातच दिलं होतं आश्वासन
08 Dec, 20 10:19 AM
भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, लोकं स्वयंस्फूर्तीने सहभागी - संजय राऊत
गेल्या 10 ते 12 दिवसांपासून शेतकरी थंडी वाऱ्याच्या पर्वा न करता, सरकारच्या दडपशाहीची पर्वा न करता दिल्लीच्या सीमारेषेवर संघर्ष करतोय त्याला पाठिंबा देणं हे देशातीलच नाही, तर जगातील नागरिकांचं कर्तव्य आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जगातील अनेक ठिकाणी मोर्चे निघाले आहेत. सरकारने मनं मोठं करून विचार केल्यास, आंदोलनामुळे तणावाखाली येण्याची सरकारला गरज नाही. कारण, कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची व्यथा ऐकायलाच हवी, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. देशभरात बंदला चांगला प्रतिसाद असून लोकं उत्स्फुर्तपणे बंदमध्ये सहभागी आहेत, असेही राऊत यांनी म्हटलं.
08 Dec, 20 09:57 AM
शेतकरी संघटनांच्या भारत बंदमध्ये कर्नाटक काँग्रेस नेत्यांचा सहभाग
08 Dec, 20 09:54 AM
केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाची होळी, स्वामीभानीचा भारत बंद
नाशिक येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिंडोरी तालुक्यातील चींचखेड येथे कृषी विधेयकाची होळी करीत भारत बंदला सक्रिय सुरुवात केली. केंद्र सरकारने केलेले हे नवे कायदे शेतकऱ्यांना उद्योगपतींच्या घशात घालणारे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे असल्याचा आरोप करीत ते रद्द झाले पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
08 Dec, 20 09:52 AM
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सिंधू बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात
08 Dec, 20 09:41 AM
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तासह सैन्य दलाच्या तुकड्याही तैनात
08 Dec, 20 09:27 AM
तेलंगणातील बस चालक-वाहक शेतकऱ्यांच्या समर्थनात, बंदला पाठिंबा
08 Dec, 20 08:07 AM
ओडिशात भारत बंदच्या समर्थनार्थ डाव्या पक्षांनी रेल्वे अडवल्या
08 Dec, 20 07:24 AM
भारत बंदमध्ये तृणमूल काँग्रेसचा सहभाग नाही, पण शेतकरी आंदोलनास पाठिंबा - ममत बॅनर्जी
08 Dec, 20 07:17 AM