पश्चिम बंगाल - केंद्र सरकारच्या आर्थिक आणि कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. मात्र, या देशव्यापी बंदला पश्चिम बंगालमध्ये हिंसक वळण लागले आहे. पश्चिम बंगालमधील कूच बिहारमध्ये जमावाने एका बसला टार्गेट केले असून त्या बसची तोडफोड केली आहे.त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हृदयपूर रेल्वे स्थानकाच्या रुळावर चार देशी बॉम्ब देखील आढळून आले आहेत. बंदात सामील झालेल्या आंदोलकांनी हावडा आणि उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील कांचरपडा स्थानकावर रेल्वे रुळांवर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे वृत्त आहे.भारत बंद या संपात १० कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. तसेच काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या देशव्यापी संपाला पाठिंबा दिला आहे. या संपामुळे बँकेच्या व्यवहारांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना एटीएममधून रक्कम काढताना अडचणी येत आहेत.
Video : संतापजनक! जनसभेसाठी भाजपा नेत्याने रोखला रुग्णवाहिकेचा रस्ता