हैदराबादच्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (Covaxin) ला लवकरच जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी भारत बायोटेकची २३ जूनला WHO च्या अधिकाऱ्यांसोबत प्री सबमिशन मिटिंग आहे. या बैठकीत स्वदेशी कोरोना लसीचे आपत्कालीन वापराच्या यादीसाठी (ईयूएल) मुल्यांकन केले जाणार आहे. (Bharat Biotech and World Health Organisation's (WHO) pre-submission meeting on June 23rd, says a WHO document. )
स्वदेशी Covaxin एवढी महागडी कशी? सर्वाधिक किंमत, कारण जाणून घ्या...गेल्या महिन्यात जेव्हा भारत बायोटकची कोव्हॅक्सिन लस सोडून अन्य साऱ्या लसींना डब्ल्यूएचओने परवानगी दिल्याने खळबळ उडाली होती. यामुळे ही लस घेतलेल्या नागरिकांना परदेशात विमान प्रवास करता येणार नव्हता. यामुळे कंपनीने लगेचच हालचाली करून या यादीतील समावेशासाठी ९० टक्के कागदपत्र, पुरावे डब्ल्यूएचओकडे जमा केले होते. यानंतर काही दिवसांनी उरलेली कागदपत्रेही जमा केली होती. परराष्ट्र मंत्रालयाने देखील कंपनीला मोठी मदत केली होती.
कोव्हॅक्सिन ही लस भारत बायोटेक आणि पुण्यातील सरकारी संस्था आयसीएमआरने विकसित केली आहे. ही लस घेतलेले नागरिक काही देशांमध्ये प्रवास करू शकत नाहीएत. भारतात सध्या दोन लसी मोठ्या प्रमाणावर टोचण्यात येत आहेत. यामध्ये कोव्हिशिल्ड देखील आहे. परंतू ती ब्रिटनची लस असल्याने तिचा आपत्कालीन वापराच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला काही प्रयत्न करावे लागले नाहीत. कोव्हॅक्सिनला मात्र यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.