कोव्हॅक्सीनमध्ये वापरलं गेलं गाईच्या वासराचं सीरम? काँग्रेसच्या प्रश्नावर भारत बायोटेकनं दिलं असं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 04:15 PM2021-06-16T16:15:48+5:302021-06-16T16:16:35+5:30
काँग्रेस नेते गौरव पांधी यांनी म्हटले आहे, की 20 दिवसांपेक्षा कमी वय असलेल्या गाईच्या वासराच्या सीरमचा वापर कोव्हॅक्सीनमध्ये केला जातो. असे असेल, तर यासंदर्भात सरकारने आधीच माहिती का दिली नाही, यामुळे धार्मीक भावनाही दुखावल्या जाऊ शकतात.
नवी दिल्ली - देशात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाचे काम सुरू आहे. अशातच लशीसंदर्भात वेगवेगळे दावे समोर येत आहेत. यातच भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनसंदर्भात काँग्रेस नेते गौरव पांधी यांनी, कोव्हॅक्सीन तयार करण्यात गाईच्या वासराचे सीरम वापरले जाते, असा दावा केला आहे. हा दावा त्यांनी एका RTI मध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे केला आहे. यावरूनच आता लशीसंदर्भात वाद सरू झाला आहे आणि खुद्द भारत बायोटेकलाच यावर स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. (Bharat biotech reactions on Covaxin newborn calf serum theory congress gaurav pandhi details)
ट्विटमध्ये करण्यात आलाय असा दावा -
काँग्रेस नेते गौरव पांधी यांनी म्हटले आहे, की 20 दिवसांपेक्षा कमी वय असलेल्या गाईच्या वासराच्या सीरमचा वापर कोव्हॅक्सीनमध्ये केला जातो. असे असेल, तर यासंदर्भात सरकारने आधीच माहिती का दिली नाही, यामुळे धार्मीक भावनाही दुखावल्या जाऊ शकतात.
कोव्हॅक्सीन बनविण्यासाठी गाईच्या वारसांची हत्या? काँग्रेस नेत्यानं शेअर केला RTI
गौरव यांनी ट्विट केले आहे, एका RTI च्या उत्तरात मोदी सरकारने मान्य केले आहे, की कोव्हॅक्सीनमध्ये गाईच्या वासराचे सीरम वापरले जाते. यात 20 दिवसांपेक्षा कमी वय असलेल्या वासरांना मारून त्याचा वाप केला जातो. हा मोठा गुन्हा आहे. ही माहिती यापूर्वीच सर्वांच्या समोर यायला हवी होती. गौरव पांधी यांनी या मुद्द्यावर आणखीही काही ट्विट केरत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे.
भारत बायोटेकनं दिली अशी प्रतिक्रिया -
काँग्रेस नेते गौरव पांधी यांच्या या दाव्यानंतर, सोशल मिडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच आता भारत बायोटेकनेही आपले स्पष्टिकरण दिले आहे. भारत बायोटेकने म्हटले आहे, की व्हायरस लशींच्या निर्मितीत गाईच्या वासरांच्या सीरमचा वापर केला जातो. याचा वापर सेल्सच्या ग्रोथसाठी केला जातो. मात्र, SARS CoV2 व्हायरसची ग्रोथ अथवा फायनल फॉर्म्यूल्यात याचा वापर करण्यात आलेला नाही.
Corona Vaccination: ‘Covishield’ लसीच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा कमी होणार? आता ८४ दिवस नव्हे तर...
भारत बायोटेकचे म्हणणे आहे, की कोव्हॅक्सीन ही पूर्णपणे शुद्ध लस आहे. सर्व प्रकारची अशुद्धी दूर करून ती तयार करण्यात आली आहे. जगभरात गेल्या अनेक दशकांपासून लशीच्या निर्मितीत वासरांच्या सीरमचा वापर केला जात आहे. साधारणपणे गेल्या नऊ महिन्यांपासून यासंदर्भात सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर माहिती देण्यात आली आहे.