Bharat Jodo Yatra: 'भाईयो और बहनो...मित्रो...' राहुल गांधींनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 08:22 AM2022-11-24T08:22:01+5:302022-11-24T08:23:59+5:30

Bharat Jodo Yatra: 'मी रोज सकाळी लवकर उठतो भरपूर चालतो. मी आतापर्यंत 2000 किलोमीटर चाललो, पण मला थकवा जाणवला नाही.'

Bharat Jodo Yatra: 'Bhaiyo aur bahno...' Rahul Gandhi mimics Prime Minister Narendra Modi | Bharat Jodo Yatra: 'भाईयो और बहनो...मित्रो...' राहुल गांधींनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल

Bharat Jodo Yatra: 'भाईयो और बहनो...मित्रो...' राहुल गांधींनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल

googlenewsNext

Congress Bharat Jodo Yatra:राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) आहे. भारत जोडो यात्रेने जळगावमधील जामोद येथून बुऱ्हानपूर मार्गे मध्य प्रदेशमध्ये प्रवेश केला. दरम्यान, यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची नक्कल केली.

भाषणात राहुल गांधींनी नरेंद्र मोदींची नक्कल केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी राहुल गांधी उपस्थित जनतेला आपला रोजचा दिनक्रम सांगत आहेत. यावेळी म्हणतात की, 'कमलनाथ यांनी मला विचारले की, तुम्हाला थकवा येत नाही का..? भाईयो और बनहो...माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला थकवा दिसतो का...मी रोज सकाळी लवकर उठतो भरपूर चालतो, पण मला थकवा येत नाही.' 

पाहा व्हिडीओ : 

'मी आतापर्यंत दोन हजार किलोमीटर चाललो आहे, पण मला थकवा आलेला नाही. मला एका सेकंदासाठीही थकवा जाणवलेला नाही. मी दररोज सकाळी उठून चालायला सुरुवात करतो. जेवढ्या वेगान सकाळी चालतो, त्याहून अधिक वेगाने रात्री 8 वाजता चालतो. हे का होत आहे माहित नाही,' असं राहुल म्हणाले. यावेळी शेवटी ते 'भाईयो और बहनो..मित्रो...' म्हणत पंतप्रधान मोदी यांची नक्कल काढताना दिसले. 

राहुल गांधी मिश्किल अंदाजात 'भाईयो और बहनो...' म्हणताच जमाव राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा देऊ लागतो. राहुल गांधींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या मीडिया प्रभारी सुप्रिया श्रीनेत यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Web Title: Bharat Jodo Yatra: 'Bhaiyo aur bahno...' Rahul Gandhi mimics Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.